Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज पुन्हा तासाभराचा ट्रॅफिक ब्लॉक; वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग कोणते?

तासाभराचा ब्लॉक असल्याने प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग सुचवले आहेत.

Mumbai Pune Expressway (Photo Credits: x/@CivilEngDis)

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग(Mumbai-Pune Expressway)वर आज पुन्हा एक तासासाठी प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. कारण महामार्गावर आज पुन्हा एक तासाचा ट्रॅफिक ब्लॉक (Traffic Block) घेण्यात येणार आहे. दुपारी १२ ते १ च्या दरम्यान हा ब्लॉक घेतला जाईल. द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत एक्स्प्रेसवेवरील वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहे. (हेही वाचा:Mumbai-Pune Expressway: मुंबई ते पुणे प्रवास आता आणखी वेगवान होणार; एमएसआरडीसीने घेतला मोठा निर्णय)

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक समस्या लक्षात घेता गॅन्ट्री बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई लेनवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग कोणते?

हलकी व जड-अवजड वाहने खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झीट येथून वळवून शेडुंग टोल नाका मार्ग मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील.