Mumbai Pune Expressway Block Today: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज सहा तासांचा जम्बो ब्लॉक
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ब्लॉक वर यापूर्वी घेण्यात आलेला ब्लॉक दिशादर्शक फलक बसवण्यासाठी घेण्यात आला होता
मुंबई पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway) वर आज 6 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत हा ब्लॉक असेल. पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचं काम करण्यासाठी आज हा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबई कडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ब्लॉक दरम्यान सर्व प्रकारची वाहने (हलकी व जड अवजड वाहने) यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्यातून मुंबईकडे येणारी वाहने पनवेल एक्झिटवरून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावर करंजाडे मार्गे कळंबोली अशी फिरून जातील. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून बोर्ले टोल नाक्याकडे न येता सरळ पनवेलच्या दिशेने पुढे जातील. मुंबईकडे येणारी हलकी वाहने खोपोली एक्झिट वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावरून पुढे जातील.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ब्लॉक वर यापूर्वी घेण्यात आलेला ब्लॉक दिशादर्शक फलक बसवण्यासाठी घेण्यात आला होता. मुंबई पुणे एक्सप्रेस वरील अपघातामध्ये अनेक प्रवाशांनी जीव गमावला आहे. त्यामुळे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम च्या माध्यमातून वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे भविष्यात केले जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2023 08:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

