Mumbai-Pune Express: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आजही मोठी वाहतूक कोंडी, बोरेघाटात वाहनाच्या रांगाच रांगा

सलग सुट्टी असल्याने लोणावळा, महाबळेश्वर, कोल्हापूर अशा पर्यटनस्थळी जाण्यासाठी निघालेल्या पर्यटकांची या वाहतुक कोंडीमुळे खुप मोठ्या प्रमाणावर निराशा झालेली पहायला मिळाली.

Mumbai Pune Expressway Representative (Photo Credits: Facebook)

वीकेंड आणि 15 ऑगस्ट व पारसी न्यू इयरच्या सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक मुंबई बाहेर पडत आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर शनिवारी दिवसभर व रात्री ते रविवारी सकाळपर्यंत वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. सलग सुट्टी असल्याने लोणावळा, महाबळेश्वर, कोल्हापूर अशा पर्यटनस्थळी जाण्यासाठी निघालेल्या पर्यटकांची या वाहतुक कोंडीमुळे खुप मोठ्या प्रमाणावर निराशा झालेली पहायला मिळाली. मुंबईहून पुण्याकडील जाणाऱ्या लेनवर बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. बोरेघाटातील अमृतांजन कमानपासून खोपोलीकडे वाहनाच्या रांगा 24 तास उलटूनही कायम आहेत. (हेही वाचा - Mumbai Local Mega Block : मुंबई लोकलचा आज मेगाब्लॉक; हार्बर आणि सेंट्रलच्या गाड्या रद्द, नवीन वेळापत्रक जारी)

मज्जामस्ती करण्यासाठी निघालेल्या नागरिकांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर कालपासून वाहतूक कोंडी कायम आहे. एक्सप्रेस वेवर दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वारंवार प्रशासनाच्या वतीने विनंती करूनही पर्यटक आपल्या खाजगी वाहनाने प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडील जाणाऱ्या लेनवर बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत.

दरम्यान आज मुंबईत देखील लोकल रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने आधीच ट्रेनने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत असताना त्यातच या वाहतुक कोंडीमुळे नागरिक अजून त्रस्त झाले आहे.