मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आज 11 ते 2 या वेळेत बंद राहणार; असा असेल पर्यायी मार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तांत्रिक कामानिमित्त आज सकाळा 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दोन्ही लेन बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील कामशेत बोगदा येथे 'स्पीड इन्फोर्समेंट सिस्टम' बसविण्यात येणार असल्या कारणाने या मार्गावरील लेन बंद ठेवण्यात येणार आहे.

Mumbai Pune Expressway (Photo Credits-Facebook)

मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai Pune Expressway) महामार्गावर तांत्रिक कामानिमित्त आज सकाळा 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दोन्ही लेन बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील कामशेत बोगदा येथे 'स्पीड इन्फोर्समेंट सिस्टम' बसविण्यात येणार असल्या कारणाने या मार्गावरील लेन बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आज 11 ते 2 दरम्यान या मार्गावरील तिस-या लेनवरील वाहतूक ही संथ गतीने सुरु राहणार आहे अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथक, प्रादेशिक विभाग पुणे यांच्यावतीने यांच्या वतीने देण्यात आली आहे.

मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांना व प्रवाशांनी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर 71 किमीचा कामशेत बोगद्यात सकाळी 11 ते 2 या वेळेत ‘स्पीड इन्फोर्समेंट सिस्टम’ बसविण्यात येणार आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा- कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूषखबर; 'तुतारी एक्सप्रेस' ला जोडले जाणार आता 4 अतिरिक्त डब्बे

शिवाय या कामामुळे द्रुतगती मार्गावरील या कालावधीत पहिली व दुसरी लेन बंद ठेवण्यात येणार असून, तिसऱ्या लेनवरून वाहतूक संथ गतीने सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

असा असेल पर्यायी मार्ग:

या मार्गावरील दुरुस्तीदम्यान वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आवश्यकतेनुसार सर्व प्रकारची वाहने द्रुतगती मार्गावरील किवळे पुलावरून जुना-मुंबई महामार्ग (NH-4) मार्गे मुंबईकडे वळविण्यात आली आहेत. त्यामुळे 11 ते 2 या वेळेत पुण्याकडून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी व प्रवाशांनी कामशेत बोगद्यादरम्यान कमी वेगाने वाहने चालवून महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement