मुंबई: केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे प्रशासनाविरोधात आंदोलन सुरु
मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) कर्मचाऱ्यांचे प्रशासनाविरोधात आंदोलन सुरु केले आहे केईएम रुग्णालयातील कोविड19 वार्डमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराच्या निधनानंतर केईएममधील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) कर्मचाऱ्यांचे प्रशासनाविरोधात आंदोलन सुरु केले आहे केईएम रुग्णालयातील कोविड19 वार्डमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराच्या निधनानंतर केईएममधील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही सुविधा दिली जात नसल्याने अधिष्ठता हेमंत देशमुख यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. केईएम रुग्णालयातील कर्मचारी काम करीत नाहीत, असे विधान त्यांनी केले होते. याचविरोधात आज सकाळी 9.30 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे, केईएम रुग्णालयामधील सर्व कर्मचाऱ्यांनी डीन यांच्या कार्यालयासमोर येऊन प्रशासनाचा निषेध केला आहे.
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, वेद्यकीय कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता अधिक प्रयत्न करत आहेत. दरम्यान, कोरोनाशी लढा देत असताना अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला लागला आहे. कोविड19 रुग्णांचे मृतदेह ताब्यात घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा पीपीई किट्स पुरवले गेले नाही. यामुळे शवागृहात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असा आरोप करत केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. याशिवाय अनेक मृतदेह तसेच पडून राहिले आहेत. त्यांचे नातेवाईकही मृतदेह ताब्यात घ्यायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत सतत त्याच्या मृतदेहामध्ये कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या जीवाला अधिक धोका आहे, असे ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- मुंबई: उत्तर प्रदेशला जाण्यासाठी वसईच्या सनसिटी मैदानावर हजारो परप्रांतीय कामगार एकत्र
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहे. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूबाबत सकारात्मक बदल दिसून न आल्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोनाबाधितांसह कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.