INS Vikrant Cheating Case: Kirit Somaiya च्या घरी EOW चं पथक चौकशीसाठी; सोमय्या घरी नसल्याने 13 एप्रिलला आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहण्याची नोटीस
त्यानंतर त्यांचा शोध लागलेला नाही.
INS Vikrant प्रकरणावरून अडचणीत आलेल्या भाजपाच्या किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या घरी आज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) धाड टाकली आहे. किरीट सोमय्या यांच्या मुंबई मधील घरी ही टीम पोहचली होती. मात्र किरीट सोमय्या आणि नील सोमय्या दोघेही घरात नसल्याने टीम माघारी परतली आहे. परंतू त्यांच्या घरावर नोटीस लावण्यात आली आहे. या नोटीसीमध्ये दोघांनाही चौकशीसाठी उद्या (13 एप्रिल) आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर रहावं लागणार आहे. असे नमूद करण्यात आले आहे.
सध्या आयएनएस विक्रांतच्या निधीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर पोलिस स्टेशन मध्ये त्या संबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिकाने गुन्हा दाखल केला असून कोर्टानेही त्यांचा जामीन फेटाळला आहे. सध्या सोमय्या पिता-पुत्र फरार आहे. आज सोमय्यांनी एक व्हिडिओ जारी करत या प्रकरणांतील आरोपांवर आपलं स्पष्टीकरण जारी केलं आहे. 'ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांवर शेवटची कारवाई होईपर्यंत मी झुकणार नाही आणि मागे हटणार नाही. माझ्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी सर्व माहिती आम्ही न्यायलयात देणार आहोत,' असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
ANI Tweet
महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या म्हणण्यानुसार, भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्यावर विमानवाहू जहाज INS विक्रांतला भंगार होण्यापासून वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यानंतर त्यांचा शोध लागलेला नाही.