Mumbai Police: बिहारमधील नगरसेविकेच्या पती हत्येप्रकरणी दोघांना मुंबईतून अटक

बिहारमधील (Bihar) औरंगाबाद (Aurangabad ) जिल्ह्यातील माजी नगरसेवकाच्या पतीच्या हत्येप्रकरणी कथितरित्या सहभागी असलेल्या दोघांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. जयकुमार सिंग उर्फ ​​शुभम सिंग (22) आणि सोनूकुमार विनय भारती उर्फ ​​शुभम गिरी (20) अशी या दोघांची नावे आहेत.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

बिहारमधील (Bihar) औरंगाबाद (Aurangabad ) जिल्ह्यातील माजी नगरसेवकाच्या पतीच्या हत्येप्रकरणी कथितरित्या सहभागी असलेल्या दोघांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. जयकुमार सिंग उर्फ ​​शुभम सिंग (22) आणि सोनूकुमार विनय भारती उर्फ ​​शुभम गिरी (20) अशी या दोघांची नावे आहेत. खबऱ्यांकडून प्राप्त माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटच्या (Mumbai Police's Crime Intelligence Unit) पथकाने शनिवारी जुहू उपनगरात सापळा रचून या दोघांना अटक केली.

पोलिसांनी अटक केलेल्या दोघांकडे केलेल्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती पुढे आली. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील अंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्षी ऑगस्टमध्ये (2022) माजी नगरसेविकेचा पती सुजित मेहता यांची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात दोघांचा सहभाग असल्याचे समोर आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा, Mumbai: तोतया सीबीआय अधिकाऱ्याकडून व्यवसायिकाचे अपहरण, 50 लाख रुपये लुटले; मुंबईतील गोरेगाव येथील घटना)

भारतीय दंड संहिता कलम 302 (खून), 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत अंबा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सनतकुमार आणि सोनूकुमार बिहार पोलिसांना हवे होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement