IPL Auction 2025 Live

Mumbai News: 8 वर्षांच्या मतिमंद मुलगा बेपत्ता, मुंबई पोलिसांनी 12 तासांत लावला शोध

त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी या उत्कृष्ट कामाबद्दल डीएन नगर पोलिसांचे कौतुक केले आहे.

Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

Mumbai News: मुंबईतील डीएन नगर पोलिसांनी (D.N Nagar) 12 तासांच्या आत बेपत्ता झालेले आठ वर्षांचे बालक शोधून काढले. 5 सप्टेंबर रोजी मुलांची आई शेरबानो सरफराज शेख  मुलगी बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली , तिचा आठ वर्षांचा मतिमंद मुलगा दुपारी खेळायला गेला होता, परंतु अनेक तास उलटूनही तो परतला नाही. परिसरात देखील शोधाशोध सुरु केल्या नंतर ही मुलगा सापडला नाही. पोलीसांनी देखील परिसरात शोधाशोध सुरु केली.

हे प्रकरणाला गांभीर्याने घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिस आणि गुन्हे शाखांची अनेक पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी स्टेशनजवळील सीसीटीव्ही तपासले असता, मूल स्टेशनच्या आत जाताना दिसले. पोलिसांना समजले की मुलगा एकटाच आहे आणि तो स्टेशनवर पोहोचला आहे, त्यामुळे त्याने कदाचित बोरिवलीसाठी स्लो ट्रेन पकडली असेल किंवा एक स्टेशन पुढे दहिसरला गेले असावे. अंधेरी ते दहिसरपर्यंत पोलिसांच्या अनेक पथकांची गस्त सुरू होती.

अखेर दहिसर पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी 12 तासांत मुलाला शोधून काढले. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी या उत्कृष्ट कामाबद्दल डीएन नगर पोलिसांचे कौतुक केले आहे.