Mumbai Police: 14 दिवसाच्या बाळासाठी मुंबई पोलीस देवदूत, घशात सेफ्टी पिन अडकल्याने झाला होता कासावीस

श्रीमंत कोळेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबई पोलीस हे नेहमीच नागरिकांच्या मदतीला धाऊन जातात. उन, वारा, पाऊस, कोरोना व्हायरस, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा मुंबई पोलिस स्वत:वर परिणाम होऊ देत नाहीत. ते सतत असतात दक्ष नागरिकांच्या मदतीसाठी.

PC Shrimant Kolekar | (Photo Credits: Mumbai Police/Twitter )

घशात सेफ्टी पिन अडकल्याने कासावीस झालेल्या अवघ्या 14 दिवसाच्या बाळासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) कॉन्स्टेबल देवदूत ठरला आहे. श्रीमंत कोळेकर (Shrimant Kolekar) असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. ते वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशन (Wadala Truck Terminal Police Station) येथे कर्तव्य बजावतात. दरम्यान, या आधीही मुंबई पोलिसात असलेल्या आकाश गायकवाड या कॉन्स्टेबलने एका मुलीस रक्तदान करुन तिच्याशी रक्ताचे नाते जोडले होते.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा येथील एका बाळाच्या घशात सेफ्टी पीन अडकली होती. त्यामुळे तो कासावीस झाला होता. अवघ्या 14 दिवसांच्या या बाळाला वेळीच वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक होते. पोलीस कॉन्स्टेबल श्रीमंत कोळेकर यांना ही माहिती मिळाली. माहिती मिळताच कोळेकर यांनी नावाप्रमाणेच मनाची श्रीमंती दाखवत बाळाला आपल्या मोटर सायकलवर घेतले आणि थेट केईएम रुग्णालयात पोहोचवले. सध्या त्या बाळावर उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Heart Surgery: मुंबई पोलीस कॉन्स्टेबल आकाश गायकवाड यांनी रक्तदान करुन तिच्याशी जोडले रक्ताचे नाते)

मुंबई पोलीस ट्विट

श्रीमंत कोळेकर यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे बाळाला वैद्यकीय उपचार वेळीच मिळू शकले. श्रीमंत कोळेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबई पोलीस हे नेहमीच नागरिकांच्या मदतीला धाऊन जातात. उन, वारा, पाऊस, कोरोना व्हायरस, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा मुंबई पोलिस स्वत:वर परिणाम होऊ देत नाहीत. ते सतत असतात दक्ष नागरिकांच्या मदतीसाठी.