Mukesh Ambani Family Death Threat: मुकेश अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी एक जण दहिसर येथून ताब्यात

प्राप्त माहतीनुसार मुंबई पोलिसांनी एका 57 वर्षीय व्यक्तीस दहिसर (Dahisar) येथून ताब्यात घेतले आहे.

Mukesh Ambani | (File Image)

प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी (Mukesh Ambani Family Death Threat) दिले प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहतीनुसार मुंबई पोलिसांनी एका 57 वर्षीय व्यक्तीस दहिसर (Dahisar) येथून ताब्यात घेतले आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या डिस्ल्पेवर आठवेळा फोन केला होता. या फोनद्वारे त्याने पुढच्या तीन तासांमध्ये संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची दिली होती. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांना या पूर्वीही धमकी आली होती. त्यामुळे पोलिसांनी याही वेळी कोणताही धोका नपत्करता सतर्कपणे काळजी घेतली आणि संशयितास पकडले.

रिलायन्स रुग्णालय व्यवस्थापनाने धमकीचा फोन येताच डीबी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्र हालवली. पहिल्यांदा ज्या फोनवरुन धमकी आली होती तो नंबर पोलिसांनी शोधला आणि संशयितांपर्यत पोहोचले. पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले की, आरोपीने एकाच क्रमांकावरुन आठ वेळा कॉल केला होता. या क्रमांकाचे लोकेशन ट्रेस करुन पोलीस संशयित आरोपीपर्यंत पोहोचले. त्याला ताब्यात घेतले असून, चौकशी सुरु आहे. (हेही वाचा, Mukesh Ambani Family Death Threat: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीकडून रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये 8 वेळा फोन)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणारा संशयित मनोरुग्ण आहे. तो मानसिकदृट्या विक्षिप्त वागतो, असे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. पोलिस अद्यापही तपास करत आहेत. सखोल चौकशीत आणखी काही माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. धमकीचा फोन येताच मुंबई पोलिसांनी सतर्कता बाळगली होती. मुंबईच्या पोलिस आयुक्तांनाही याबाबत माहिती देण्यात आली होती. यासोबतच अंबानी कुटुंबीयांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. व