Mumbai: बलात्काराच्या गुन्ह्यात आरोप टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच अटक

भरत मुंढे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सदर पोलीस अधिकारी हा उपनिरीक्ष पदावर ना. म. जोशी मार्ग पोलीस (NM Joshi Marg Police Station) ठाण्यात कार्यरत आहे. या अधिकाऱ्याने बलात्कार (Rape Case) प्रकरणातील एका अरोपीकडे तब्बल 7 लाख रुपयांची लाच मागितली होती.

(FILE IMAGE)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील एका अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. भरत मुंढे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सदर पोलीस अधिकारी हा उपनिरीक्ष पदावर ना. म. जोशी मार्ग पोलीस (NM Joshi Marg Police Station) ठाण्यात कार्यरत आहे. या अधिकाऱ्याने बलात्कार (Rape Case) प्रकरणातील एका अरोपीकडे तब्बल 7 लाख रुपयांची लाच मागितली होती. बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीचे नाव गुन्ह्यातून हटवण्यासाठी त्याने ही लाच मागितल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, लोअर परळ येथे वास्तव्यास असलेल्या एका तरुणाच्या नातेवाईकाविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस स्टेशन दप्तरी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सहआरपी असल्याचा आरोप या नातेवाईकावर होता. दरम्यान, या व्यक्तीस सहआरोपी करायचे नसेल तर 36 लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी उपनिरीक्ष पदावर असलेल्या भरत मुंढे नामक अधिकाऱ्याने संबंधित तरुणाकडे केली. दरम्यान, एकूण 37 लाख रुपये खंडणीचा तपशीलही त्याने तरुणाला दिला. एकूण 37 लाखांपैकी 30 लाख तक्रारदार तरुणीस देण्यासाठी व 5 लाख स्वत:ला आणि उर्वरीत दोन लाख रुपये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसाठी ठेवण्यात येतील असे या अधिकाऱ्याने तरुणास सांगितले. अखेर इतकी मोठी रक्कम आणायची तरी कोठून हा प्रश्न पडल्याने नैराश्येत गेलेल्या तरुणाने अखेर लाचखोर अधिकाऱ्याला होकार दिला. मात्र, सोबतच एसीबीच्या वरळी येथील कार्यालयात लेखी तक्रार दिली. (हेही वाचा, Bribery In India: लाचखोरीच्या बाबतीत भारत आशियामध्ये पहिल्या स्थानावर; मालदीव आणि जपानमध्ये लाच घेण्याचे प्रमाण सर्वात कमी )

तरुणाने दिलेल्या तक्रारीची एसीबी पथकाने खात्री करुन घेतली. त्यानंतर एसीबीने आपल्या पद्धतीने सापळा लावला. या वेळी तरुणाकडून सात लाख रुपये घेताना एसीबीने भरत मुंढे यास रंगेहात पकडले. एसीबीने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये मुंढे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे. तसेच, या अधिकाऱ्याने या आधीही कोणाकडून अशाच प्रकारे पैसे उकळले आहेत का? याबाबतही तपास सुरु आहे.