Mumbai Mounted Police Unit: मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या नव्या अश्वदल युनिफॉर्मचे मुंबई पोलिसांनी मानले आभार; इथे पहा गणवेशाची खास झलक
तसेच मरोळ येथील पोलीस मैदानावर घोडेस्वाराचे प्रशिक्षण अन्य सर्व तयारी पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.
मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात येत्या 26 जानेवारी रोजी अश्वदल (Mounted Police Unit) पुन्हा कार्यरत केले जाणार आहे. तसेच मरोळ येथील पोलीस मैदानावर घोडेस्वाराचे प्रशिक्षण अन्य सर्व तयारी पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. सध्या घोडेस्वार पोलिसांसह त्याच्या गणवेशाचीही चर्चांनी अधिक जोर धरला आहे. घोडेस्वार पोलिसांचा गणवेश प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी तयार केला आहे. याकरिता मुंबई पोलिसांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसेच अश्वदलामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर चांगला प्रभाव पडेल असे ट्वीट मुंबई पोलिसांनी केले आहे.
मुंबई पोलीस दलामध्ये आता अश्व दलाचाही समावेश करण्यात येणार आहे. येत्या 26 जानेवारी 2020 पासून मुंबई पोलीस दलात अश्वदल सहभागी होत आहेत. पोलीस घोड्यावर स्वार असल्यामुळे त्यांना उंचीवरुन जमावावर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे. तसेच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि समुद्र किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी अश्वदल उपयुक्त ठरणार आहे. सध्या घोडेस्वार पोलिसांच्या गणवेशाने अनेकांना आकर्षित केले. यातच मुबई पोलिसांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहेत. यात ते म्हणाले की, अनेक वर्षानंतर अश्वदलाचा मुंबई पोलिसांत समावेश झाला आहे. तसेच अश्वदलाचा गणवेश डिझाईन केल्याबदल मनीष मल्होत्रा यांचे त्यांनी आभार मानले आहे. महत्वाचे म्हणजे, अश्वदलामुळे न्याय आणि सुव्यवस्थेवर चांगला प्रभाव पडेल, असे लिहलेले ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे. हे देखील वाचा- मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल
मुंबई पोलिसांचे ट्विट-
खरे तर ब्रिटीश काळात मुंबई पोलिस दलात अश्वदल कार्यरत होतं. मात्र 1932 मध्ये ते बंद करण्यात आले. आता 88 वर्षांनंतर पुन्हा एकदा हे युनिट सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनापासून हे अश्वदल पोलीस दलात असेल अशी माहिती मिळत आहे. आत्तापर्यंत सरकारनं 13 घोडे खरेदी केले असून येत्या 26 जानेवारीला शिवाजी पार्कच्या पथसंचलनात 11 घोडेस्वार पोलीस सहभाही होणार आहे.