Mumbai Police Wishes Merry Christmas: मुंबई पोलिसांनी रस्ता सुरक्षा आणि सायबर सुरक्षेकडे लक्ष वेधून नागरिकांना दिल्या अनोख्या पद्धतीने ख्रिसमसच्या शुभेच्छा!

तुमच्या बँक खात्याला स्कॅमरच्या विश-लिस्टमध्ये येऊ देऊ नका!' असं कॅप्शनही दिलं आहे.

Mumbai Police Wishes Merry Christmas (PC - Instagram)

Mumbai Police Wishes Merry Christmas: आज सर्वत्र ख्रिसमस (Christmas 2023) सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अशातच आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) देखील नागरिकांना अनोख्या पद्धतीने नाताळ सणाच्या शुभेच्छा शेअर केल्या. मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एका पोस्टमध्ये सांता हेल्मेट घालून वाहन चालवताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी सायबर सुरक्षा (Cybersecurity) आणि पासवर्ड संरक्षणावर (Password Protection) प्रकाश टाकला आहे.

मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'यावर्षी नाताळबाबाला भेट म्हणून सुरक्षा मागूया! या ख्रिसमसमध्ये तुमच्या भेटवस्तू आणि पासवर्ड गुप्त ठेवा. तुमच्या बँक खात्याला स्कॅमरच्या विश-लिस्टमध्ये येऊ देऊ नका!' असं कॅप्शनही दिलं आहे. (हेही वाचा - Merry Christmas 2023 Messages: ख्रिसमस निमित्त सोशल मीडियावर Images, Greetings, Quotes, Wishes शेअर करून साजरा करा नाताळ सण!)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

दरम्यान, दुसऱ्या एका पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी हेल्मेट घातलेल्या सांताक्लॉजचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना मुंबई पोलिसांनी लिहिलं आहे की, 'सुरक्षितता ही सुट्टीचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यासाठी एकमेव कलम(e) आहे. या सणासुदीच्या हंगामात, आपल्या वर्तमानाची काळजी घेऊन आनंद आणि उत्साह ठेवा. ज्या प्रमाणे सांता हेल्मेट घालतो, तसे तुम्हीही घाला. आपल्या सगळ्यांचा लाडका 'Santa’ नियमांचे पालन करूनच भेटवस्तू आणत आहे.' (Christmas 2023: 'सांताक्लॉज', 'ख्रिसमस ट्री'चा इतिहास काय आहे? जाणून घ्या या उत्सवाची सुरुवात कशी झाली)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

या पोस्टमध्ये सांताक्लॉज त्याच्या पारंपारिक वाहनाऐवजी स्कूटर चालवत आहे. दुचाकीवर लाल रंगाचे कपडे घातलेल्या सांताने हेल्मेट घातले आहे. मुंबई पोलिसांनी लोकांना सांताकडून प्रेरणा घेण्यास सांगितले जो राईड दरम्यान हेल्मेट घालतो.