Disclosure: 'ती' मार्गदर्शीका आमची नव्हे- मुंबई पोलीस
जसे की, सरकारी संकेतस्थळं, सोशल मीडिया अकाऊंट्स, सरकारी कार्यालयं, पोलीस अथवा राज्याचे माहिती व जनसंपर्क संचलनालय आदी.
सावधान! कोरोना व्हायरस संकटादरम्यान लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि त्यानंतर सुरु करण्यात आलेल्या मिशन बिगिन अगेन’ (Mission Begin Again) संदर्भात एक मार्गदर्शिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जिचा मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि अधिकृततेशी काहीच संबंध नाही. होय! मुंबई पोलिसांनीच स्वत:च आपल्या ट्विटर हँडलवरुन त्याबाबत खुलासा केला आहे. तसेच, अधिकृत माहितीसाठी 100 क्रमांकावर संपर्क साधा असेही म्हटले आहे.
संबंधित मार्गदर्शिकेबद्दल सांगताना मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''आम्ही मुंबईकरांना सांगू इच्छितो की, संलग्न पोलिस मार्गदर्शक सूचना मुंबई पोलिसांनी जारी केलेली नाही.आम्ही नागरिकांना विनंती करतो की या संदेशावर विश्वास ठेवू नये. तसेच मित्र किंवा कुटूंबातील सदस्यांना या मार्गदर्शिकेबद्दल हा मेसेजही पुढे पाठवू नये. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून रहा. त्यासाठी 100 हा क्रमांक डायल करा''.
कोणत्याही प्रकारच्या अधिकृत शासन निर्णय, माहिती यांबाबत सरकारच्या अधिकृत मंचावरुन माहिती दिली जाते. जसे की, सरकारी संकेतस्थळं, सोशल मीडिया अकाऊंट्स, सरकारी कार्यालयं, पोलीस अथवा राज्याचे माहिती व जनसंपर्क संचलनालय आदी. (हेही वाचा, लॉकडाउनच्या दरम्यान ठराविक दिवसांसाठी मुंबईतील सर्व दुकाने सुरु करण्यासाठी महापालिका आयुक्तांची परवानगी, जाणून घ्या WhatsApp वर व्हायरल होणाऱ्या मेसेज मागील सत्य)
दरम्यान, काही समाज कंटक समाजाची दिशाभूल करण्यासाठी किंवा काही वेळासाठी विकृत आनंद घेण्याच्या दृष्टीने अथवा व्यक्तिगत स्वार्थासाठी, नागरिकांच्या फसवणुकीसाठी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारे संदेश पसरवतात. प्रामुख्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारचे संदेश अधिक मोठ्या प्रमाणावर पसरवले जातात. त्यामुळे पोलीस अथवा इतर सरकारी यंत्रणेला पुढाकार घेऊन अशा संदेशांचे खंडण करावे लागते. त्यासोबतच हा संदेश आमचा नाही, असेही सांगावे लागते.