Sachin Tendulkar यांच्या घराबाहेर आंदोलन करणारे आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात; ऑनलाईन गेम्स जाहिरात प्रकरणी आक्रमक

बच्चू कडू हे अचलपूरचे अपक्ष आमदार आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी सचिन तेंडुलकर यांच्या ऑनलाईन गेम्सच्या जाहिरातीमध्ये झळकण्याला प्रखर विरोध केला आहे.

Sachin Tendulkar Bacchu Kadu | insta

मुंबई मध्ये आज क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)  याच्या घरासमोर आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)  यांनी आंदोलन केले आहे. ऑनलाईन गेम्सच्या जाहिराती (Online Games Ads) मध्ये सचिन तेंडुलकर दिसत असल्याने बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. भारतरत्न पुरस्काराने नावजलेल्या व्यक्तीने अशाप्रकारे ऑनलाईन गेम्सची जाहिरात करून तरूणपिढीसमोर चूकीचे आदर्श ठेवले जात आहेत. त्यांनी जाहिरात सोडावी अन्यथा भारतरत्न पुरस्कार पुन्हा द्यावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. सध्या बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर सध्या मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सचिन तेंडुलकर पैशांसाठी जाहिरात करत असतील तर त्यांच्या साठी येत्या गणेशोत्सवामध्ये आपण खास दानपेटी ठेवणार आहोत. त्यामध्ये गोळा झालेले पैसे सचिन तेंडुलकर यांना दिले जातील असं बच्चू कडूंनी आज म्हटलं आहे. जर सचिन तेंडुलकर यांच्याकडे भारतरत्न नसता तर आम्ही आंदोलन केलं नसतं असंही ते म्हणाले आहेत.

आमदार बच्चू कडू यांनी यापूर्वी एक पत्र लिहून सचिन तेंडुलकर यांच्या विरूद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी पत्र लिहलं होतं. परंतू कोणतीच कारवाई न झाल्याने अखेर आज त्यांनी मुंबईतील सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर आंदोलनाला सुरूवात केली आहे. Legal Notice To Sachin Tendulkar: आमदार Bachchu Kadu पाठवणार सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण .

बच्चू कडू हे अचलपूरचे अपक्ष आमदार आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी सचिन तेंडुलकर यांच्या ऑनलाईन गेम्सच्या जाहिरातीमध्ये झळकण्याला प्रखर विरोध केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now