मुंंबई: CAA समर्थनार्थ आयोजित 'संविधान सन्मान मार्च' ला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

सुरेश हावरे, सुभाष कांबळे, रणजित सावरकर, अनंत पळशीकर, आमदार अतुल भातखळकर या मोर्च्यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली होती.

CAA | Photo Used for Representative Purpose | Photo Credits: Twitter

भारतामध्ये नागरिकत्व कायदा लागू केल्यानंतर ईशान्य भारतापाठोपाठ विविध भागामध्ये त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. दरम्यान मुंबईमध्ये नागरिकत्त्व कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाने मोर्चा आयोजित केला होता. परंतू पोलिसांनी त्याला परवानगी नाकारल्याने आता मोर्चा रद्द करण्यात आला आहे. मुंबईत संविधान सन्मान मंचच्या वतीने आयोजित या मोर्च्यामध्ये विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र आता मोर्च्याऐवजी एक शिष्टमंडळ केवळ गिरगाव चौपाटीजवळील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे दर्शन घेणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत हा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.  CAA च्या समर्थनार्थ आज मुंबईत संविधान सन्मान मार्च

ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरागाव चौपाटी असा हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सुरेश हावरे, सुभाष कांबळे, रणजित सावरकर, अनंत पळशीकर, आमदार अतुल भातखळकर या मोर्च्यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरामध्ये वाहतुकीमध्येही बदल करण्यात आले होते.

महाराष्ट्रामध्ये आता नागरिकत्त्व कायदा लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप ठोस भूमिका सांगितलेली नाही. काही दिवसांपूर्वी भाजपाकडून मुंबईमध्ये अशाप्रकारे सीएएच्या समर्थनार्थ भाज्पा रस्त्यावर उतरले होते.