Coronavirus मुळे तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतला 'हा' मोठा निर्णय
याच पार्श्वभुमीवर मुंबई पोलीस दलातील 55 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या आणि अन्य आजार असणाऱ्या सर्व हवालदारांना भरपगारी रजा देत असल्याची घोषणा केली आहे
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा देत जनसामान्यांचे रक्षण करण्यासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा अहोरात्र मेहनत घेत आहे. मात्र अशातच मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्याचे मागील 48 तासात समोर आले आहे. या घटनांनंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Mumbai Police Parambir Singh) यांनी एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्तांनी मुंबई पोलीस दलातील 55वर्षांहून अधिक वय असणाऱ्या आणि अन्य आजार असणाऱ्या सर्व हवालदारांना भरपगारी रजा देत असल्याची घोषणा केली आहे. काल,सोमवार , 27 एप्रिल पासून ते लॉक डाऊन संपेपर्यंत ही रजा असणार आहे. याबाबत सर्व पोलीस ठाण्यातील व वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. Lockdown मध्ये बाहेर फिरताना रोखल्याने तिघांनी मिळून पोलिसांवरच केला हल्ला; पिंपरी- चिंचवड मधील धक्कादायक प्रकार
प्राप्त माहितीनुसार, कोरोनाचा सर्वात मोठा टार्गेट वर्ग हा 50 हुन अधिक वय असणारा आहे त्यातही जर का कोणाला मधुमेह, रक्तदाब असे अन्य आजार असतील तर हा धोका आणखीन प्रबळ होतो, अशावेळी या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिसांच्या अख्तियारीत येणाऱ्या पोलीस ठाण्यात व वाहतूक विभागातील पोलिसांना हा निर्णय लागू होणार आहे. दरम्यान या पोलिसांनी स्वतःच इच्छा दाखवल्यास त्यांना कामावर येऊ द्या असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुंबई मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यातील 57 वर्षीय हवालदार व मुंबई पोलीस दलातील 52 वर्षीय हेड कान्स्टेबलचा यांचा शुक्रवार व शनिवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर काल सुद्धा कुर्ला वाहतूक विभागात कार्यरत 56 वर्षीय हवालदार सोनावणे यांचा सुद्धा काल कोरोनाने बळी घेतला होता. याच पार्श्वभूमीवर आता हा निर्णय घेणयात आला आहे. मुमबी पोलीस आयुक्तालयाकडून सर्व ठाण्यातील 50 ते 58 वयोगटातील कर्मचाऱ्यांचे आरोग्याचे तपशील सध्या मागवून घेणयात आले आहेत.