Sex Racket Busted in Mumbai: मुंबई पोलिसांकडून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 3 बांगलादेशी महिलांची सुटका, 8 आरोपींना अटक

या महिलनांना वैद्यकीय क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशहून मुंबईत आणण्यात आले होते. परंतु, नंतर जबरदस्तीने त्यांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपींना अटक केली आहे.

Sex Racket Busted in Mumbai: मुंबई पोलिसांकडून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 3 बांगलादेशी महिलांची सुटका, 8 आरोपींना अटक
sex racket | Representational Image | (Photo Credit: PTI)

Sex Racket Busted in Mumbai: मुंबईच्या मालवणी पोलिसांनी नुकतेच एका सेक्स रॅकेट (Sex Racket) चा पर्दाफाश केला आहे. घटनास्थळावरून 3 बांगलादेशी महिला नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. या महिलनांना वैद्यकीय क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशहून मुंबईत आणण्यात आले होते. परंतु, नंतर जबरदस्तीने त्यांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुटका केलेल्या महिला बांगलादेशातील गरीब कुटुंबातील आहेत. त्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी काम शोधत होत्या. आरोपींनी या असहाय्यतेचा फायदा घेतला आणि त्यांना मुंबईतील रुग्णालयात नोकरीचे खोटे आश्वासन देऊन मुंबईत आणले. गेल्या महिन्यात, भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमा बेकायदेशीरपणे ओलांडून या महिलांना मुंबईत आणण्यात आले. (हेही वाचा - Minor Rape Survivor Abortion: बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीस गर्भपातास परवानगी, 28 आठवड्यांची मुदत; मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय)

14 बांगलादेशी महिलांची सुटका -

दरम्यान, मुंबईत पोहोचल्यानंतर, या महिलांना त्यांची बांगलादेशी ओळख लपविण्यासाठी बनावट आधार कार्ड देण्यात आले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. विशिष्ट माहितीवरून कारवाई करून, मालवणी पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून एकूण 14 बांगलादेशी महिलांची सुटका केली. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्यांच्यावर तस्करी, शोषण आणि बनावट कागदपत्रे पुरवल्याचा आरोप आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2025 05:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).