मुंबई पोलिसांकडून Sex Tourism Racket उधळलं; 2 जणांना अटक तर दोघांची सुटका

मुंबई पोलिसांनी आता क्राईम ब्रांच यांच्या मदतीने विमानतळावर एका महिलेच्या टीप वरून सेक्स टुरिझमचा पर्दाफाश केल्याची माहिती ANI वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिली आहे.

Mumbai Police | (Photo Credits: Twitter)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई क्राईम ब्रांच (Mumbai Crime Branch) कडून एक सेक्स टुरिझम रॅकेट (Sex Tourism Racket) उधळण्यात आलं आहे. यामध्ये 2 जणांना अटक करण्यात आली असून दोघा जणांची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी जारी केलेल्या नोटिसीमध्ये The Immoral Traffic (Prevention) Act अंतर्गत 2020 मध्ये अटक करण्यात आलेल्या एका महिलेच्या खात्रीलायक माहितीनुसार सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान माहिती देणारी महिला देखील तिच्या साथिदारासोबत सेक्स टुरिझम रॅकेट चालवत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये गोव्यासाठी एक ट्रीप आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पोलिस फसवणारा ग्राहक म्हणून काम करत होते तर आरोपींकडून दोन मुलींची निवड करण्यात आली होती. एअरपोर्ट वर ट्रॅप करण्यात आला होता. इथे तीन महिला ऑफिसरला भेटल्या. यावेळी पैसे आणि एअर तिकीट एकमेकांना देण्यात आले. टीम मध्ये 3 महिलांचा समावेश होता. दरम्यान अधिकार्‍यांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना मुख्य आरोपींची माहिती मिळाली. या मुख्य आरोपीने डिपार्चर गेट मध्ये प्रवेश मिळवून बोर्डिंग पास मिळवला. नक्की वाचा: Sex Racket Busted in Thane: ठाण्यात पोलिसांच्या कारवाईत एक सेक्स रॅकेट उघड; 5 महिलांची सुटका .

ANI Tweet  

पोलिसांनी मुख्य आरोपीला CISF आणि एअरपोर्ट पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले. पोलिस कोठडीमध्ये टाकून तिच्याकडून पुढील विचारणा करण्यात आली. यावेळी पोलिस तपासामध्ये तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांकडून तिला कोर्टात दाखल केल्यानंतर एक दिवसाची पोलिस कोठडी देखील सुनावण्यात आली. तर सुटका करण्यात आलेल्यांना शेल्टर होम मध्ये पाठवण्यात आले आहे.