Mumbai Police: वाढदिवसाच्या पार्टीत बिल देण्यावरुन वाद; एकाची हत्या, चौघांना अटक

मुंबई पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चौघांना अटक केली आहे. या चौघांवर एका तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. चारपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. उरलेले दोन आरोपी शाहरुख आणि निशार यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

Mumbai Police: वाढदिवसाच्या पार्टीत बिल देण्यावरुन वाद; एकाची हत्या, चौघांना अटक
Mumbai Police | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुंबई पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चौघांना अटक केली आहे. या चौघांवर एका तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. चारपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. उरलेले दोन आरोपी शाहरुख आणि निशार यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या चौघांनी मिळून साबीर नावाच्या तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. वाढदिवसाच्या पार्टीत बिल देण्यावरुन या सर्वांमध्ये वाद झाला होता. या वादातून या चौघांनी साबीर याची हत्या केल्याचा आरोप आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी चारही आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 302, 323, 109 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Love Jihad: आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटर Mohsin Khan च्या भावावर 'लव्ह जिहाद’चा आरोप; खेळाडूनेही बलात्कार केल्याचा पिडीतेचा दावा (Watch Video))

ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2023 08:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).