वाहनचालकांना आता बेस्टच्या आगारात पार्किंग करता येणार
त्यानुसार कारवाई करत महापालिकेने एका आठवड्यात लाखो रुपयांच्या दंडाची वसूली करण्यात आल्याचे सांगितले गेले.
मुंबईत (Mumbai) काही दिवसांपूर्वीच बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय महापालिकेने (BMC) लागू केला. त्यानुसार कारवाई करत महापालिकेने एका आठवड्यात लाखो रुपयांच्या दंडाची वसूली करण्यात आल्याचे सांगितले गेले. परंतु मुंबईत गाडी पार्किंगसाठी कायेदशीर जागा अत्यंत कमी असल्याची स्थितीसुद्धा आहे. त्यामुळे काही चालक बेकायदेशीर ठिकाणी गाडी पार्किंग करतात. याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होते. मात्र आता पार्किंगच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बेस्टने निर्णय घेतला आहे.
बेस्ट प्रशासनाकडे त्यांच्या आगारात पार्किंगसाठी प्रशस्त जागा आहे. तसेच सध्या बसची एकूण संख्या 3700 घरात असून उर्वरित जागेवर गाडी पार्किंग करता येणार आहे. तर पार्किंगसाठी सुरुवातीला तासांनुसार कमी दर आकारण्यात येणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे. यामुळे वाहतुकोंडी आणि बेकायदेशी पार्किंगची समस्या काही प्रमाणात सोडवली जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.(मुंबईत बेकायदेशीर गाडी पार्किंग केल्यास 15 हजारापर्यंत दंड वसूल करणार)
परंतु भविष्यात बेस्टकडे अजून नव्या गाड्या येणार आहे. तोपर्यंत बेस्टच्या आगारात दुचाकीसह चारचाकी गाड्यांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी वाहनांच्या प्रकारासह तासांप्रमाणे वाहन पार्किंगचे दर आकारले जाणार आहेत. यामुळे चालकांना बेकायदेशीर ठिकाणी पार्किंगमुळे करण्यात येणाऱ्या कारवाईपासून दिलासा मिळणार आहे.