Mumbai Airport: महिलेच्या बॅगेत बॉम्ब ठेवल्याचा दावा, मुंबई विमानतळावर घबराट

महिलेने सोबत अधिक सामना आणले होते. त्याचे शुल्क म्हणून तिला वाढीव पैसे भरावे लागतील असे सांगण्यात आल्यानंतर तिने हा दावा केला.

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport | (Photo Credit - Twitter/ANI)

मुंबई (Mumbai) येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) आलेल्या एका महिलेने तिच्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचा दावा केला. महिलेच्या दाव्यामुळे मुंबई विमानतळावर एकच घबराट आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. महिलेने सोबत अधिक सामना आणले होते. त्याचे शुल्क म्हणून तिला वाढीव पैसे भरावे लागतील असे सांगण्यात आल्यानंतर तिने हा दावा केला.

महिलेने अधिक वाढीव सामनाचे अधिक पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेने दावा केला की, तिने दावा केला की तिने तिच्या बॅगेत बॉम्ब ठेवला होता. तिच्या दाव्याची खातरजमा करण्यासाठी करण्यात आलेल्या तपासणीत तिच्या बॅगमध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही. (हेही वाचा, Jet Crashes in Karnataka: कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये जेट क्रॅश; 2 पायलट सुखरूप बाहेर, Watch Video)

पोलिसांनी तातडीने कारवाई करत सदर महिले विरुद्ध गुन्हा दाखल केला. सहारा पोलीस स्टेशन दप्तरी सदर महिलेविरुद्ध भादंवि कलम 336 आणि 505(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिला अटक करण्यात आली. महिलेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला.