IPL Auction 2025 Live

Mumbai Online Shopping Fraud: फक्त 660 रुपयांची कुर्ती पडली अडीच लाख रुपयांना; मुंबईतील तरुणीला ऑनलाईन शॉपींग महागात

केवळ 660 रुपयांमध्ये कुर्ती खरेदी करण्याचा मोह तिला लाखोर रुपयांचा आर्थिक भुर्दंड देऊन गेला. अंधेरी एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर काम करत असलेल्या या तरुणीने सोशल मीडियावरील (Social Media) जाहीरात पाहून 660 रुपयांना मिळणारी कुर्ती ऑनलाईन खरेदी केली.

Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Online Shopping Fraud: ऑनलाईन शॉपींग (Online Shopping) करणे मुंबई (Mumbai) येथील एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. केवळ 660 रुपयांमध्ये कुर्ती खरेदी करण्याचा मोह तिला लाखोर रुपयांचा आर्थिक भुर्दंड देऊन गेला. अंधेरी एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर काम करत असलेल्या या तरुणीने सोशल मीडियावरील (Social Media) जाहीरात पाहून 660 रुपयांना मिळणारी कुर्ती ऑनलाईन खरेदी केली. धक्कादायक म्हणजे कुर्ती खरेदी केल्यावर या तरुणीला फोन आला. फोनवरील व्यक्तीने (Cybercriminals) सांगितले की, आपली कुर्ती पाठविण्यात आली असून पार्सल घरपोच मिळेल. मात्र त्यासाठी आपल्या खात्यावरुन पाच रुपये पाठविण्यास सांगितले. समोरील व्यक्तीवर विश्वास ठेऊन तरुणीने मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करुन पाच रुपये पाठवले सुद्धा. पण झाले भलतेच.. तरुणीच्या बँक खात्यावरुन टप्प्याटप्याने असे तब्बल अडिच लाख रुपये वळते झाले. हा प्रकार लक्षात येताच तरुणीने आलेल्या फोन क्रमांकावर फोन केला. पण, तो क्रामांक बंद असल्याचे आढळून आले.

मुंबईच्या अंधेरी परिसरात राहणारी ही मुलगी एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर काम करते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकवर तिला एक जाहीरात पाहायला मिळाली. या जाहीरातीमध्ये दोन हजार रुपयांची कुर्ती केवळ 660 रुपयांना मिळत असल्याचे सांगण्यात येत होते. ऑफरला भूलून तरुणीने ही कुर्ती ऑर्डर केली. कुर्ती ऑर्डर करताच तिला समोरुन फोन आला. जो सायबर गुन्हेगारांचा होता. त्यांनी तरुणीला सांगितले की, तुमचे पार्सल विलेपार्लेपर्यंत पोहोचले आहे. पण, हे पार्सल घरपोच मिळण्यासाठी तुम्हाला आम्ही देतो त्या लिंकवरुन पाच रुपये पाठवावे लागतील, असे सांगितले. तरुणीनेही पाच रुपये पाठवले. त्यानंतर समोरील व्यक्तीने दोन दिवसांमध्ये आपले पार्सल आपल्या घरपोच होईल, असे सागितले आणि फोन ठेऊन दिला. (हेही वाचा, Mumbai Cyber Crime: महिलेचा फोन हॅक करत Private Photos वरून ब्लॅकमेलिंग करणार्‍या पुरूषाला पुण्यात अटक)

समोरील व्यक्तीशी बोलने होऊन फोन ठेऊन दिल्यानंतर पुढच्या अवघ्या काही मिनिटांतच तरुणीचे धाबे दणानले. कारण तरुणीच्या बँक खात्यातून पैसे वळते होते होते. धक्कादायक म्हणजे ही रक्कम टप्प्याटप्याने वळती होत होती. टप्प्याटप्याने करत अशी या तरुणीच्या खात्यातून तब्बल अडीच लाख रुपये वळते झाले. तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांशी संपर्क साधला. बोगस जाहिरात आणि कॉलमुळे आपण फसवले गेलो हे लक्षात येताच तिने अंधेरी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरुन अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल क्रमांक, लिंक आणि बँक खाते आदी पुराव्यांच्या अधारे मुंबई पोलीस तपास करत आहेत.