कांद्याचे दर 150 रुपयांवर पोहचणार, सामान्यांच्या शिखाला बसणार कात्री
त्यानंतर आता पुन्हा कांद्याचे दर 150 रुपये प्रति किलो होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सामान्यांच्या शिखाला चांगलीच कात्री बसणार आहे.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपूर्वी वाढलेले होते. त्यानंतर आता पुन्हा कांद्याचे दर 150 रुपये प्रति किलो होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सामान्यांच्या शिखाला चांगलीच कात्री बसणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याची आवक निम्म्यापेक्षा कमी झाल्याने दर 100 रुपयांच्या वर पोहचले आहेत. मात्र पुढील दिवसात हे दर अधिक वाढणार आहेत.
पावसाचा फटका शेतीला झाला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त असून त्यांच्या पिकाला योग्य हमीभाव सुद्धा बाजारात दिला जात नाही आहे. या सर्व परिस्थितीत कांद्याच्या शेतीला फटका बसला असून कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तर मुंबईतील बाजारात कांद्याचे दर 120 रुपयांच्या वर जाऊन पोहचले आहेत. एवढेच नव्हे तर प्रति किलो मध्ये अवघे 10-12 कांदे विक्रेत्यांकडून दिले जात आहेत.
कांद्याचे दर वाढल्याने त्याची आयात सुद्धा कमी झाली आहे. घाऊक बाजारात कांद्याचे दर 60 ते 80 रुपये प्रति किलो असून किरकोळ बाजारात त्याचे दर 90 ते 120 रुपये किलो आहेत. तर कांद्याचे वाढलेले दर पाहता याचा परिणाम मुंबईतील हॉटेलमध्ये सुद्धा झाला आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये कांद्यासाठी अधिक 20 रुपये स्विकारले जात आहेत.(नाशिक येथे 1 लाख रुपयांचा कांदा चोरीला, उत्पादकाकडून पोलिसात तक्रार दाखल)
मागील वर्षीच्या तुलनेत कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने हे दर वाढले आहेत. तसेच परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे खरिपात पेरण्यात आलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकसह दक्षिण भारतातील राज्यात परतीच्या पावसाने कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये नवा कांदा उपलब्ध झाला नाही. परिणामी कांद्याचे दर गगणाला भिडले आहेत.