मुंबई इशान्य लोकसभा लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: मनोज कोटक विरुद्ध संजय दिना पाटील यांच्यामध्ये होणार टक्कर, कोण असणार आघाडीवर?

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या मुंबई इशान्य लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे.

मुंबई इशान्य लोकसभा लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: मनोज कोटक विरुद्ध संजय दिना पाटील यांच्यामध्ये होणार टक्कर, कोण असणार आघाडीवर?
प्रतिकात्मक फोटो | (Photo courtesy: archived, edited, Symbolic images)

Mumbai North-East Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या मुंबई इशान्य लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) उमेदवार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil), शिवसेना-भाजप (Shivsena-BJP) युतीचे उमेदवार मनोज कोटक (Manoj Kotak) आणि बहुजन वंचित आघाडी (BVH) उमेदवार संभाजी शिवाजी काशीद (sambhaji Kashid) यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, आघाडीसाठी प्रतिकुल अंदाज दर्शवले आहेत. याच पार्श्वभुमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी ठरणार आहे. जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

मुंबईतील इशान्य मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. या मतदारसंघातून उभे असलेले उमेदवार मनोज कोटक, संजय दिना पाटील आणि संभाजी शिवाजी काशीद यांच्यामध्ये लढत रंगली होती. दरम्यान या दिवशी महाराष्ट्रात 57 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली होती. तत्पूर्वी शिवसेना-भाजप युतीने किरीट सौमय्या ऐवजी यंदा मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमधली ही एकमेव जागा. इथून संजय दिना पाटील हेच पुन्हा निवडणूक लढवत आहेत.मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील हेच इथून लढले होते. मोदी लाटेमध्ये त्यांचा जोरदार पराभव झाला आणि किरीट सोमय्या निवडून आले. यावेळी मात्र त्यांच्यासमोर भाजपचा नवा उमेदवार आहे.(Exit Poll Results 2019 India: 'एक्झिट पोल'चे अंदाज एनडीएच्या बाजूने; देशात पुन्हा मोदी सरकार)

चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी महाराष्ट्रातील 17 मतदारासंघामध्ये मतदान घेण्यात आले. तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी यंदा जोरदार प्रचारसभेतून मतदारांना आपवल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आज येणाऱ्या निकालावरुन कोणाच्या बाजूने जनमताचा कौल लागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 23, 2019 08:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).