Mumbai News: 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, मालाड येथील घटना
Sexual Crime | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Mumbai News: मुंबईतील मालाड (Malad) परिसरात एका दहा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार (Physically Abused Minor Boy) केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुलाला निर्जनस्थळी नेऊन दोघांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मालाड पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे.( हेही वाचा- अल्पवयीन मुलावर तरुणीचे लैंगिक अत्याचार, अपहरण करुन लैंगिक अत्याचार)

मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या अंगाणासमोर खेळत असताना, दोन जण त्यांच्या जवळ आले आणि त्याला चॉकलेटचं आमिष दाखवून एका निर्जनस्थळी घेऊन गेले. कुटुंबीयांच्या नकळत दोघांन्ही मुलावर अत्याचार केला. त्यानंतर हा घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास, मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने घाबरून ही घटना कोणालाही सांगितली नाही. घाबरून तो नैराश्यात गेला होता. मात्र, त्याने ही घटना घरच्यां कुटुंबियांना सांगितली.

कुटुंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करताच, चौकशी सुरु केली.  कन्ना परीमल आणि तंबा परीमल अशी या दोन आरोपींची नावे आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केले. मालाड पोलिसांनी  377, 506 (2), 38 भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींना अटक केली आहे. आता पुढील तपास सुरु केला आहे.