Mumbai: अल्पवयीन मुलावर तरुणीचे लैंगिक अत्याचार, अपहरण करुन लैंगिक अत्याचार
पीडित मुलगा आणि आरोपी एकाच परिसरात राहात असत. काही महिन्यांपूर्वीच दोखांची ओळख झाली. त्यातून आरोपीने मुलाला आपल्या जाळ्यात ओढले. त्यातून तिने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले असा आरोप आहे.
Mumbai Rape Case: प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्या भावनांचा गैरफायदा घेत एका 20 वर्षीय तरुणीने वय वर्षे अवघे 15 असलेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ही घटना मुंबई शहरातील चेंबूर परिसरात घडली. तरुणी केवळ अत्याचार करुनच थांबली नाही तर तिने या मुलाचे अपहरणही केले. टिळक नगर पोलीस दप्तरी या प्रकरणातील आरोपी विरोधात अपहरण आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगा आणि आरोपी एकाच परिसरात राहात असत. काही महिन्यांपूर्वीच दोखांची ओळख झाली. त्यातून आरोपीने मुलाला आपल्या जाळ्यात ओढले. त्यातून तिने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले असा आरोप आहे. आरोपीला अटक करण्यात आले असून पीडित मुलाची सुटका झाली आहे.
तरुणीकडून मुलाचे अपहरण
दरम्यान, अचानक एक दिवशी आरोपी तरुणी आणि पीडित मुलगा बेपत्ता झाले. मुलाच्या कुटुंबीयांनी तातडीने टिळक नगर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. घडल्या प्रकारामुळे परिसरातही खळबळ उडाली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अपहरण झालेला मुलगा आणि आरोपी तरुणीचा शोध सुरु केला. दरम्यान, पोलीस तपासामध्ये आरोपी आणि पीडित मुलगा दोघेही चेन्नईमध्ये असल्याचे आढळून आले. दोघांनाही चेन्नई येथूनच ताब्यात घेण्यात आले.
आरोपी तरुणी, पीडित तरुण चेन्नई येथून पोलिसांच्या ताब्यात
चेंबुर परिसरात अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही सन 2015 मध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली होती. ज्यामध्ये 40 वर्षे वयाच्या एका महिलेने मुलाच्या अल्पवयीन मित्राला दारु पाजून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. ती महिला एवढे करुन थांबली नाही तर तिने त्याच्याशी दबाव टाकत जबरदस्तीने विवाहसुद्धा केला होता. प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर महिलेवर पॉक्सो अंतर्गत गु्न्हा दाखल करुन अटकही झाली होती. त्यांतर जवळपास 7 वर्षांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना याच भागात घडली आहे.
पुणे शहरातही अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
पुणे शहरातील कोंडवा बुद्रुक परिसरातही अशाच प्रकारची घटना घडली आहे. ज्यामध्ये पोलिसांनी तुरुणीरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मे 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडली. या प्रकरणात 28 वर्षीय तरुणीने अल्पवयीन दबाव टाकून लैंगिक संबंध प्रस्तापीत केले. त्यासाठी 'माझ्याशी सेक्स कर नाहीतर तुझ्याविरुद्ध बलात्काराची केस करेन' अशी धमकीही आरोपीने पीडित मुलाला दिल्याचे पुढे आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 25, 2023 12:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

