Mumbai News: सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणीवर बलात्कार, मालाड पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल

सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणीवर २४ वर्षीय तरूणाने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Instagram (PC - pixabay)

Mumbai News: सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणीवर 24 वर्षीय तरूणाने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाळकेश्वर येथील आहे. हे प्रकरण  16 जानेवारी रोजी उघडकीस आले आहे.पीडिताने मालाड पोलिस ठाण्यात आरोपीविषयी तक्रार केली आहे, तरुणी 21 वर्षाची असल्याचे समजत आहे. आरोपीने दारूच्या नशेत तरुणीवर बलात्कार केल्याचे तक्रारात म्हटलं आहे. (हेही वाचा- प्रेयसीची हत्या करून तरुणाची ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; )

मिळालेल्या माहितीनुसार, हितेश शाह असं आरोपीचे नाव आहे, इंस्टाग्रामवर दोघांची ओळख झाली होती. दोन महिने एकमेकांशी बोलत होते. त्यानंतर 13 जानेवारीला मुंबईत भेटायचं ठरवलं. मुंबईत एका पबमध्ये ड्रिंक्ससाठी भेटले. मध्यरात्री पुन्हा एका पब मध्ये गेले आणि त्यानंतर जेवण्यासाठी हॉटेलमध्ये गेले. ड्रिंक्समुळे तरुणी दारूच्या नशेत होती. बेशुध्द अवस्थेत असताना तिला हितेशने वरळीतली सर पोचखानवाला रोड येथील एका टॉवरवर त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला.सकाळी महिलेला जाग आली असताना तिला शरिरावर जखमा झाल्या. तिच्यावर बलात्कार झाल्याचं लक्षात आले.

या घटनेनंतर ती तणावात आली. तिने या घटनेची माहिती पालकांना सांगितली. त्यानंतर दोन दिवशींनी या घटनेची माहिती मालाड पोलिसांना दिली. मालाड पोलिस ठाण्यातील हे प्रकरणा वरळी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.हितेश शाहा यांच्याविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला पकडण्यासाठी पोलिस पाठवण्यात आले. परंतु हितेश बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.