Mumbai News: कांदिवलीत 'जय श्री राम' म्हणण्यास नकार दिल्याने परप्रांतीयांकडून तरुणाला मारहाण; एफआयआर दाखल

कांदिवलीतील क्रांतीनगर येथे जय श्री राम म्हणण्यास नकार दिल्याबद्दल एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

fight | pixabay.com

Mumbai News:  कांदिवलीतील क्रांतीनगर येथे जय श्री राम म्हणण्यास नकार दिल्याबद्दल एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेअंतर्गत चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व्यक्ती बजरंग दलाशी संबंधित असल्याचा दावाही तक्रारदाराने केला आहे. आरोपींवर पोलीसांनी शांतता भंग केल्या प्रकरणी आणि दुखापत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.   27 सप्टेंबर रोजी कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सिध्दार्थ आंगुरे कामावरून घरी येत असताना चार जणांनी त्यांचा रस्ता रोखला, त्यांना जय श्री राम म्हणण्याची मागणी केली. सिध्दार्थने नकार दिल्याने आरोपीने त्याच्या धार्मिक संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर हल्ला केला, हात पायांनी मारहाण केली आणि त्याला जमिनीवर ओढले. त्याच्या भावाला फोनवरून ही घटना सांगितली आणि तो आणि त्याचा पुतण्या तातडीने घटनास्थळी पोहोचला आणि आरोपींपासून अंगुरेची सुटका केली. त्यानंतर अंगुरे यांना उपचारासाठी कांदिवली पश्चिम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांनी कुरार पोलिस ठाण्यात जाऊन चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 पोलिसांनी सामान्य एफआयआर दाखल केला आणि मी विनंती केलेली एफआयआर नोंदवली नाही. हे आरोपी बजरंग दलाचे आहेत. चार हल्लेखोरांपैकी सूरज तिवारी आणि ​​कबीर मिश्रा यांना तत्काळ अटक करण्यात आली. मात्र, अरुण पांडे आणि राजेश या रिक्षाचालकाला पकडण्यात यश आले नसून ते सध्या फरार आहेत.

या घटनेचा मुंबई काँग्रेसने निषेध केला आहे. "मुंबईकर हे सहन करणार नाहीत," असे मुंबई काँग्रेसने सोशल मीडिया वर एका पोस्ट शेअर केला आहे. पीडितेच्या मदतीला धावून आलेल्या वंचित बहुजन आघाडीने हल्लेखोरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास मदत केली. सुजात आंबेकर, व्हीबीएचे नेतेही पुढे आले आणि त्यांनी पोलिसांशी बोलून याप्रकरणी योग्य कारवाईची मागणी केली.



संबंधित बातम्या