Mumbai Crime News: वडाळ्यात सापडला अर्ध जळलेला महिलेचा मृतदेह, गुन्हा दाखल

मुंबईतील वडाळा परिसरात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Crime (PC- File Image)

Mumbai Crime News: मुंबईतील वडाळा परिसरात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महिलेचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असू शकते असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. धक्कादायक म्हणजे महिलेचा मृतदेहाचे तीन तुकडे करण्याता आले आहे. वडाळा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेअंतर्गत पोलिस कसुन चौकशी करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील आमच्या गस्ती पथकाला एक संशयास्पद पिशवी सापडली होती, ज्यामध्ये एक जळलेला मृतदेह होता. या घटनेची माहिती वडाळा पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी तपासणी केली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टसाठी केएईमएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

महिलेचा मृतदेह पिशवीत होता. संशय आल्याने पिशवी तपासली केली असता तो अर्धा जळलेला मृतदेह आढळून आला. महिलेचा मृत्यू दोन किंवा एक दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मुंबईच्या क्राईम ब्राचच्या पथकाने देखील ही या घटनेअंतर्गत शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement