Mumbai News: माजी विद्यार्थ्याकडून शिक्षकाची फसवणूक, 63 लाखांचा लावला चूना, कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कांदीवली येथील एका ३३ वर्षीय शिक्षकाला त्याच्या माजी विद्यार्थ्याने फसवणुक केल्याचे समोर आले आहे.
Mumbai News: कांदीवली येथील एका 33 वर्षीय शिक्षकाला त्याच्या माजी विद्यार्थ्याने फसवणुक केल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांने गुंतवणूक करून घोटाळ्याचे आमिष दाखवून 63.20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकणी विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पाटोळे असं पीडित शिक्षकाचे नाव आहे. आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहे.(हेही वाचा- चेक बाऊन्स आणि फसवणूक प्रकरणात कायदेशीर सवलीचे आमिष दाखविणाऱ्यास अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम येथील उत्कर्ष मंदिर हायस्कूलमधील शिक्षकाची फसवणूक केली आहे. त्यांचा माजी विद्यार्थी किशोर मंचेकर यांनी 2018 मध्ये रिसॉर्ट आणि किराणा व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले आणि खोटे आश्वासन देऊ लागला. पटोले यांनी पाच लाख रुपये सुपुर्द केले होते. 2020 मध्ये, पटोले यांनी क्रेडिट सोसायटीकडून 28 लाखांचे कर्ज घेतले आणि त्यांच्या बॅंक ऑफ महाराष्ट्र खात्यातून मंचेकरांच्या कॉसमॉस बॅंक खात्यात रु. 23.20 लाख हस्तांतरित केले. नंतर पटोले याने फायनान्स कंपनीकडून 25 लाखांचे कर्ज घेण्यास प्रवृत्त केले आणि माचेकर यांना 12.50 लाख रुपये दिले.
2023 मध्ये रिसॉर्टसाठी जामीनदाराची गरज होती त्यावेळी त्यांनी विनंती केली आणि सर्व आवश्यक कागदरत्रे घेवून ठेवले. माचेकर यांनी पटोले यांच्या नावावर अॅक्सिस बँक आणि इतर फायनान्स कंपन्यांकडून त्यांना न कळवता फसवणूक करून 20 लाखांचे कर्ज घेतले. त्यानंतर पटोळे यांची समजूत काढून किराणा दुकाने सुरु करण्याच्या बहाण्याने बायोमेट्रिक अंगठ्याचा ठसा देऊन फसवले. 28 नोव्हेंबर 2023 रोजी आरोपी कुटुंबासह फरार झाला. मंचेकर यांनी इतर तिघांचीही फसवणूक केल्याचे पटोले यांना नंतर समजले. मंचेकरांनी या प्रकरणात चारकोप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत आहे.