Mumbai News: अस्वच्छ अन्न, उंदीर आणि झुरळं आढळल्याने 'बडे मिया' रेस्टोरंट मध्ये एफडीएचा छापा, मुंबईत खळबळ
अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी सांयकाळी दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील लोकप्रिय बडेमिया रेस्टोरंन्टवर छापा टाकला.
Mumbai News: अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी सांयकाळी दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील लोकप्रिय बडेमिया रेस्टोरंन्टवर छापा टाकला. अस्वच्छ खाद्यपदार्थ दिल्याप्रकरणी छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे. एफडीएच्या छाप्यात किचनमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला. छापेमारीत सोबत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत लायसन्स नसल्याचे आढळून आले. काही दिवसांपुर्वी एका हॉटेल मध्ये जेवणात उंदीर आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
बडेमियाच्या सर्व आऊटलेट्सना काम थांबवण्याची सूचना देण्यात आली आहे. एफडीएला असेही आढळून आले की 76 वर्षीय रेस्टोरंट मध्ये उंदीर आणि झुरळं आढळून आली. ताजमहाल हॉटेलच्या मागे, कुलाबा येथे असलेले आयकॉनिक फूड स्टॉल, लिप-स्माकिंग कबाबसाठी प्रसिद्ध आहे जे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते.“बडेमिया आउटलेटवर बुधवारी संध्याकाळी अचानक छापा टाकण्यात आला आणि त्यांच्या सर्व आऊटलेट्सकडे ऑपरेट करण्याचा लायसन्स नव्हता.
तर, दुसरीकडे 'बडे मियाँ रेस्टोरंट'चे मालक इफ्तिकार शेख यांनी एफडीए अधिकाऱ्यांचा दावा फेटाळून लावला आहे. आमच्याकडे व्यवसायासंबंधीचा परवाना असल्याचे शेख यांनी स्पष्ट केले. सायंकाळच्या सुमारास अन्न आणि औषध प्रशासनाने काही अधिकाऱ्यांसह पथक आले होते. त्यांनी रेस्टोरंटची पाहणी केली आणि काही नमुने सोबत घेऊन गेले असल्याची माहिती इफ्तिकार शेख यांनी दिली.