Mumbai Accident: लालबाग परळ उड्डाणपुलावर भीषण अपघात, दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू; तपास सुरू

लालबाग परळ उड्डाणपुलावर शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडक झाल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.

Accident (PC - File Photo)

Mumbai Accident:  लालबाग परळ उड्डाणपुलावर शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडक झाल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. काळाचौकी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. काळाचौकी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद रिझवी जोहर रजा उर्फ ​​जोसेफ आणि अहमद रिझवान शेख हे दोघे दुचाकीस्वार आपल्या मित्रांसह गोवंडीतील गौतम नगर येथून डोंगरीकडे दुचाकीवरून जात होते. वाहनाची धडक बसल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

लालबाग - परळ उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक बसल्याने जोसेफ आणि शेख एकाच दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला. दोघांनाही जवळच्या मसिना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रस्त्यावर काही काळ वाहतूक सेवा ठप्प होती. अपघातानंतर रस्त्यावर बऱ्याच वेळ गर्दी जमली होती.

दोघेजण काही मित्रांसोबत डोंगरीला जात होते. हे सर्वजण बाईकवर होते आणि एकत्र निघाले होते, पण जोसेफ आणि शेख पुढे होते. पाठोपाठ आलेले मित्र जेव्हा लालबाग परळ उड्डाणपुलावर पोहोचले तेव्हा त्यांना तिथे गर्दी जमलेली दिसली. चौकशी केल्यावर त्यांना जोसेफ आणि शेख जखमी अवस्थेत पडलेले दिसले. त्यांच्या मित्रांनी त्यांना तातडीने मसिना हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जोसेफचा भावाने या घटनेअंतर्गत पोलिसांत तक्रार दाखल केली. . त्यानंतर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध कलम २७९, ३०४, १३६ आणि १८४ अन्वये एफआयआर नोंदवून तपास सुरू केला.