Mumbai News: ऑर्बिट व्हेंचर्सचे बिल्डर राजन ध्रुव यांच्या वांद्रे येथील निवासस्थानावर ईओडब्ल्यूचा छापा
गेल्या वर्षी हायकोर्टाने देखील त्याला अटक करण्याचे आदेश दिले होते.
Mumbai News: मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सोमवारी पहाटे ऑर्बिट व्हेंचरचे बिल्डर राजन ध्रुव (Rajan Druv) यांच्या वांद्रा येथील निवासस्थानावर छापा टाकला. गेल्या 4 तासांपासून त्यांनी दरवाजा उघडला नव्हता आणि ईओडब्ल्यूचे अधिकारी बाहेर थांबले होते. निवासस्थानावरून त्यांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचसोबत मोबाईल, लॅपटॉप या सर्व वस्तू जप्त केले. या प्रकरणात पोलीसांनी सापळा रचला होता. गेल्या वर्षी हायकोर्टाने देखील त्याला अटक करण्याचे आदेश दिले होते.
काल रात्री EOW ने राजन ध्रुवच्या वाद्रे पाली हिल येथील निवास्थानी छापा टाकला. EOW ने 3 तास वाट पाहिली आणि दार उघडले नाही म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) नुसार त्याचा दरवाजा तोडला. त्याचा मुलगा त्याच्या नोकरांसह सापडला. पोलिसांनी प्राथमिक तपास केला. मुंबई हायकोर्टाने पोलीस आयुक्तांना आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. गेल्या वर्षी जुलैमध्ये हायकोर्टाने मुंबई पोलीस आयुक्तांना ऑर्बिट व्हेंचर्स बिल्डर्सचा शोध घेऊन त्यांना पकडण्याचे निर्देश दिले होते कारण ते दोघे फरार होते. पोलीसांनी तेव्हा पासून त्याकडे लक्ष देवून होतं.
1 जानेवारी 2021 पासून पेमेंट होईपर्यंत ऑर्बिटकडून 163 कोटी रुपये प्रतिवर्षी 16.25 टक्के व्याजासह वसूल करण्यासाठी अॅक्सिस फायनान्सने दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्ट सुनावणी करत होता. EOW अधिकारी छापे पुष्टी करतात, काल रात्री नवीन गुन्हा दाखल झाल्यानंतर EOW च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑर्बिट व्हेंचर डेव्हलपर्स जोडी राजन आणि हिरेन ध्रुव यांच्यावर छापे टाकल्याची पुष्टी केली. “सुरुवातीला त्यांनी दरवाजे उघडण्यास नकार दिला पण शेवटी पोलिसांना आत जाण्यात यश आले आणि शोध घेण्यात आला, अशी माहिती EOW अधिकाऱ्याने माध्यमांना दिली.