Kasara Accident: कसारा घाटात चार वाहनं एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

या भीषण अपघातात अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चार वाहनांमध्ये हा विचित्र अपघात झाला असून दोघा जणांना जीव गमवावा लागला आहे. यातील अपघातग्रस्त वाहनामध्ये कोंबड्याची वाहतूक सुरु होती.

Kasara Accident:  कसारा घाटात चार वाहनं एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
Accident (PC- File Photo)

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) कसारा घाटात (Kasara Ghat) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. चार वाहनांमध्ये हा विचित्र अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक कोंबड्याही या मरण पावल्या असून अपघातानंतर रस्त्यावर कोंबड्यांचा खच दिसून आला. दरम्यान या अपघाताचे कारण समजू शकले नाही.

या भीषण अपघातात अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चार वाहनांमध्ये हा विचित्र अपघात झाला असून दोघा जणांना जीव गमवावा लागला आहे. यातील अपघातग्रस्त वाहनामध्ये कोंबड्याची वाहतूक सुरु होती. मात्र अपघातात वाहनाचा चक्काचूर झाल्याने अनेक कोंबड्या मरण पावल्या आहेत. त्यामुळे कसारा घाटात कोंबड्यांचा खच दिसून आला. आयशर, छोटा हत्ती आणि दोन पिकअप वाहनांमध्ये हा विचित्र अपघात झाला. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला पुढील उपचारासाठी इगतपुरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये चारही वाहने एकमेकांवर आदळली. या भयानक घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य काहीजण गंभीर जखमी झाले. याशिवाय आयशर ट्रकमधील कोंबड्यांचा देखील मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर घाटात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेतले असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2023 01:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).