मुंबई: वडाळा येथील श्री गणेश साई इमारतीला लागलेली भीषण आग नियंत्रणात; १५ जण गंभीर जखमी
मुंबईसह पुणे शहरातही अशाच प्रकारे आगीच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील उरळी देवाची येथे एका कपड्याच्या गोदामाला आग लागली होती. ज्यात पाच कामगारांचा गुदमरुन आणि होरपळून मृत्यू झाला होता.
मुंबई (Mumbai) शहरातील वडाळा (पश्चिम) परिसरात असलेल्या कमला राम नगर येथील बरकत अली नाका (Barkat Ali Naka) येथील श्री गणेश साई (Shree Ganesh Sai Building) इमारतीच्या पहिल्या मजल्याला भीषण आग लागली. ही घटना आज (शुक्रवार, 21 जून 2019) पहाटे ३ वाजनेच्या सुमारास लागली. दरम्यान, अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, या आगीत १५ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
या आगीत जखमी झालेल्या सर्व पीडितांना एईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाचे सीएमओ डॉ. श्रीकांत के यांनी पीडितांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, मुंबई: मालाड येथील मालवणी झोपडपट्टीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी)
दरम्यान, गेल्या प्रदीर्घ काळापासून मुंबईत आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मुंबईसह पुणे शहरातही अशाच प्रकारे आगीच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील उरळी देवाची येथे एका कपड्याच्या गोदामाला आग लागली होती. ज्यात पाच कामगारांचा गुदमरुन आणि होरपळून मृत्यू झाला होता.