Mumbai: मुंबईतील वाहनचालकांना सीएनजी पुरवठ्यातील कमी दाबाचा फटका, अनेक सीएनजी पंप बंद
नेटवर्कमध्ये पुरेसा दाब नसल्याने हे पंब बंद असल्याचे सांगितले जात आहे. पुरेसा दाब नसेल तर पुढे पुरवठा सुरु करता येऊ शकत नाही. त्यामुळे हे पंप बंद ठेवावे लागत असल्याचे सांगण्यात येत होते.
मुंबई (Mumbai) शहर हद्दीत येणारे अनेक सीएनजी पंप (CNG Pumps) आज (12 ऑगस्ट) बंद असल्याचे पाहायला मिळाले. नेटवर्कमध्ये पुरेसा दाब नसल्याने हे पंब बंद असल्याचे सांगितले जात आहे. पुरेसा दाब नसेल तर पुढे पुरवठा सुरु करता येऊ शकत नाही. त्यामुळे हे पंप बंद ठेवावे लागत असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, पंप अचानक बंद राहिल्याने ग्राहकांची मात्र चांगलीच अडचण झाली. खास करुन ऑटो, टॅक्सी चालकांना ( Taxi, Auto Services) याचा अधिक फटका बसला.
दरम्यान, कोणतीही अगावू सूचना न देता पंप बंद राहिल्याने ग्राकांना मनस्ताप सहन करावा लागलाच. सोबत त्याचा वाहतूकीवरही मोठा परिणाम झाला. प्रामुख्याने सकाळची वेळ ही मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. प्रत्येकाला आपल्या कामावर आणि घरी जाण्याची घाई असते. त्यामुळे वाहतूक कोंडीत न अडकता रस्ता मोकळा मिळावा ही मुंबईकरांची अपेक्षा असते. अशातच अशी काही घटना घडली तर सगळाच बट्ट्याबोळ होतो. (हेही वाचा, CNG Pump Ownership: सरकार देणार स्वतःचा सीएनजी पंप सुरु करण्यासाठी 10 हजार परवाने, तुम्हीही करु शकता अर्ज, वाचा सविस्तर)
दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, प्रवाशांना जवळपास अर्धा तासासांहून अधिक काळ वाहनांची वाट पाहावी लागली.. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्थानकाबाहेर रांगा होत्या. तर रिक्षा, टॅक्सीचासुद्धा तुटवडा होता. कंटाळून अनेकांनी शेवटी अनेकांनी सकाळी प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसेसचा पर्याय निवडला