मुंबईत 800 हून अधिक अधिकृत खड्डे असल्याची माहिती पण नागरिकांनी व्यक्त केला संताप

त्याचसोबत खड्ड्यांमुळे एखाद्याचा जीव गेल्याच्या घटना सुद्धा घडतात. अशातच आता मुंबईतील 1 हजार खड्डे बुझवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: Twitter/bhatia_niraj23)

Mumbai Potholes: मुंबईतील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना फार मोठा मनस्ताप होते. त्याचसोबत खड्ड्यांमुळे एखाद्याचा जीव गेल्याच्या घटना सुद्धा घडतात. अशातच आता मुंबईतील 1 हजार खड्डे बुझवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पण नागरिकांनी यावर असे म्हटले की, सांगण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा आणखी किती तरी खड्डे अद्याप यामध्ये समावेश करण्यात आलेले नाहीत. बहुतांश नागरिक आणि निवडून आलेल्या नेत्यांनी सुद्धा खड्ड्यांबद्दल वारंवार तक्रारी केल्या आहेत.(Cyclone Gulab: गुलाब चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात; राज्याला 3-4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा)

महापालिकेने नागरिकांना खड्ड्यांसंदर्भात माहिती देण्यासाठी त्यांनी अधिकृत वेबसाइट mybmcpotholefixit.com किंवा ट्विटरवर त्यांना त्याबद्दल तक्रार करु शकता असे म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर जुन ते 24 सप्टेंबर पर्यंत एकूण 822 तक्रारी आल्याचे दाखविले जात आहे. तर गेल्या वर्षात याच काळात 848 तक्रारी आणि 2019 मध्ये 795 तक्रारी आल्या होत्या.

खड्ड्यांमुळे समस्या येत असल्याची तक्रार करत कलिना येथे राहणाऱ्या एका स्थानिकाने असे म्हटले की, जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करताना आधीच लहान रस्त्यावरील गर्दी आणि खड्डे यामुळे त्रास सहन करावा लागला. जरी खड्डे बुजवले गेले असले तरीही त्यांचे योग्य काम करण्यात आलेले नाही. त्याचसोबत व्यवस्थितीत काम केले की नाही ते सुद्धा कोणीही पाहिले नाही.

किंग सर्कल येथे राहणाऱ्या निखिल देसाई यांनी म्हटले की, प्रत्येक वर्षी रस्त्यांच्या डागडुजीसाठी कोटी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र कालांतराने त्याची अवस्था आधीसारखीच झालेली दिसते. या व्यतिरिक्त खड्डे बुजवण्यासाठी तक्रार केली असता ती एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे पाठवली जाते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif