गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर घरे देणार?

मुंबईतील (Mumbai) गिरणी कामगारांना (Mill Workers) घरे उपलब्ध करुन द्यावीत मात्र ती मुंबईबाहेर असतील असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री राधा कृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil) यांनी केले.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईतील (Mumbai) गिरणी कामगारांना (Mill Workers) घरे उपलब्ध करुन द्यावीत मात्र ती मुंबईबाहेर असतील असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री राधा कृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)  यांनी केले. त्यामुळे विखे यांच्या या वक्तव्यामुळे गिरणी कामगार संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे नाहीत. त्याचसोबत अतिरिक्त भुखंड सुद्धा शिल्लक नाही असे कारण देत महानगर क्षेत्रात म्हाडाने घरांची निर्मिती करावी असे विखे पाटील यांनी म्हटले आहे. त्याचसोबत नैना सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करुन द्यावीत असे सुद्धा विखे यांनी सुचवले आहे. परंतु मुंबई बाहेर घरे मिळणार या कारणामुळे कामगार संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र सरकारकडून याबाबत मध्यस्थी झाल्यास गिरणी कामगारांना मुंबईतच घरे उपलब्ध होतील असे कामगार संघटनेच्या प्रवीण घाग यांनी म्हटले आहे.

(महाराष्ट्रात 53 टक्के पुरुष तर 42 टक्के महिला अविवाहित, रोजगार-शिक्षणातून बदलतेय मानसिकता: सर्वेक्षणातून माहिती उघड)

तर गिरण्यांची जमिन मुंबईत जवळजवळ 73 एकर आहे. बोरिवली मधील खटाव मिलची जमिन 34 एकरची आहे. तसेच कल्याण, अंबरनाथ आणि ठाण्यात सरकारची 184 एकर जमिन आहे. त्यामुळे तेथे सर्वसामान्यांना परवडणारी घरे उभारणे शक्य आहे असे बोलण्यात येत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून उरण परिसरात गिरणी कामगारांना घरे देणार असल्याचे आश्वासन फोल ठरत असल्याची टीका गिरणी कामगारांकडून केली जात आहे.