MHADA Lottery Mumbai 2024: मुंबई म्हाडा लॉटरी, आजच अर्ज करा; शेवटचे फक्त दोन दिवस बाकी; घ्या जाणून

त्यामुळे मुंबईमध्ये घर घेऊ इच्छित असाल तर आपण अर्ज दाखल करु शकता. अर्ज दखल करण्याची शेवटची मुदत 19 सप्टेंबर आहे.

MHADA Lottery | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

MHADA Lottery Mumbai 2024: मुंबईमध्ये हक्काचं घर घेऊ पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची संधी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थातच म्हाडा 2030 घरांसाठी सोडत काढत आहे. महत्त्वाचे म्हणजे ही सोडत म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे काढण्यात येणार आहे. सहाजिकच मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मात्र, त्यासाठी तुम्ही अद्यापही अर्ज (How to Apply MHADA) केला नसेल तर तुम्हाला त्वरा करण्याची गरज आहे. कारण म्हाडा लॉटरीसाठी (MHADA Lottery) शेवटची मुदत 19 सप्टेंबर आहे. म्हणजेच आता केवळ आजसह शेवटचे दोनच दिवस बाकी आहेत. आगोदर ही मुदत 9 सप्टेंबर करण्यात आली होती. मात्र त्यात वाढ करुन ती 19 पर्यंत वाढवून देण्यात आली होती. जी आता संपत आहे.

म्हाडा लॉटरी अपडेट

सोडतीनंतर उपलब्ध होणारी म्हाडा घरांची ठिकाणे

उपलब्ध होणारी घरे वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी आहेत. तशीच ती वेगवेगळ्या भागात आहेत. ही घरे उपलब्ध होणारी ठिकाणे:

घरांच्या किमतीत कपात

म्हाडा लॉटरी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या दराबाब प्रश्न उपस्थित करण्यात आला. वास्तविक पाहता हे दर खरोखरच अधिक होते. परिणामी या घरांच्या दरांच्या किमतीत 10 ते 12 लाख रुपयांची घट करण्यात आली आहे.

कसा कराल अर्ज?

दरम्यान, म्हाडाने वेळोवेशी सांगितले आहे की, घरांसाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचाच वापर अर्जदारांनी करावा. आपण अर्ज दाखल करताना आणि आर्थिक व्यवहार करताना आपण म्हाडासोबतच व्यवहार करतो आहोत याची खात्री करुन घ्यावी. मधल्या काही काळात बनावट संकेतस्थळांनी म्हाडाची तोतयागिरी केली होती. ज्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी म्हाडा सतर्क झाले आहे. शिवाय त्यांनी अर्जदार आणि नागरिकांनाही सतर्कतेचे अवाहन केले आहे.