Mumbai MHADA Lottery 2024: मुंबई मध्ये म्हाडाच्या लॉटरीमधील 370 फ्लॅट्सच्या किंमती कमी होणार; अर्ज भरण्यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 फ्लॅट्सच्या किंमती कमी होणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.

MHADA | (Photo credit: archived, edited, representative image)

Cut Down In Mumbai MHADA House Price:  म्हाडा (MHADA)  कडून सध्या मुंबई (Mumbai)  मध्ये जाहीर केलेल्या 2030 घरांच्या लॉटरी मध्ये एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी या लॉटरी मध्ये दिली आहे. तसेच आता अर्ज करण्यासाठी देखील 19 सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यंदा मुंबई म्हाडाच्या लॉटरीला नागरिकांकडून घराच्या किंमती आवाक्याबाहेर असल्याने अल्प प्रतिसाद मिळाला होता. परिणामी आता म्हाडाकडून खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या घरांच्या किंमतीत 10 ते 25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. नक्की वाचा: MHADA Lottery 2024: म्हाडा आगामी काळात वर्षातून दोनवेळा लॉटरी काढणार. 

कुठल्या घरांच्या किंमतींमध्ये होणार कपात?

म्हाडाच्या घरांच्या लॉटरी मध्ये मध्यम आणि उच्च गटासोबतच अल्प, अत्यल्प गटातील घरांच्या किंमती देखील कमी होणार आहेत. खासगी विकासकांकडून म्हाडाला विक्रोळी, बोरिवली, सांताक्रुज, मुलुंड, माझगाव, ओशिवारा, चेंबूर, भायखळा, गोरेगाव, वडाळा, दादर, घाटकोपर, कांदिवली परिसरात असलेल्या ठिकाणी घरं उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या घरांच्या किंमती कमी होणार आहेत. यामध्ये म्हाडा कडून तयार केलेल्या घरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (हेही वाचा- म्हाडा गृहनिर्माण लॉटरी घोटाळा, बनावट वेबसाईट द्वारे अर्जदारांना फसवणाऱ्या दोघांना अटक).

अर्ज करण्यास मुदतवाढ

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याकरिता 4 सप्टेंबर ही अंतिम मुदत होती पण आता त्यामध्ये बदल करून ही तारीख 19 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे. यामुळे आता ड्रॉ ची देखील तारीख बदलली जाऊ शकते. म्हाडाकडे 2030 घरांसाठी 22,400 अर्ज आले आहेत आणि 14,839 अर्जदारांनी अनामत रक्कम दिली आहे. पण आता मुदत वाढ देऊन आणि काही घरांच्या किंमती कमी करून अर्ज वाढणार का? हा प्रश्न आहे.

दरम्यान मुंबई सारख्या शहरात सामान्य नागरिकांना हक्काचं घर घेता यावं म्हणून म्हाडा कडून काही घरं उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी अर्ज मागवून भाग्यवान अर्जदारांना ती उपलब्ध करून दिली जातात.