MHADA Lottery 2024: म्हाडा आगामी काळात वर्षातून दोनवेळा लॉटरी काढणार

म्हाडाकडून प्रत्येक शहरात वर्षातून दोनवेळा लॉटरी काढण्याचं नियोजन आहे. मात्र, मुंबईत म्हाडापुढं प्रमुख आव्हान हे जागेचं आहे. परवडणाऱ्या घरांची दरवर्षी निर्मिती करावी लागणार आहे.

MHADA Lottery 2024: म्हाडा आगामी काळात वर्षातून दोनवेळा लॉटरी काढणार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : PTI)

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून करण्यात आलं आहे. या घरांची विक्री आगामी काळात म्हाडाकडून सोडतीद्वारे केली जाईल. यासाठी प्रत्येक वर्षात दोनवेळा लॉटरी काढली जाईल, असं म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी याबाबतची माहिती दिली. म्हाडाकडून मुंबईसह राज्यातील विविध भागात गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी केली जाते. म्हाडाकडून दरवर्षी लॉटरी काढली जाते. आता म्हाडानं 2030 घरांसाठी अर्ज मागवले आहेत. या घरांसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु आहे.  (हेही वाचा - Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी सोडतीपूर्वी वेबिनारचे आयोजन, गृहनिर्माण संस्थेकडून 'अधिकृत संकेतस्थळ'च वापरण्याचा सल्ला; कारणही घ्या जाणून)

म्हाडाकडून क्लस्टर डेव्हलपमेंट योजना कामाठीपुरा, आदर्शनगर, बांद्र आणि इतर ठिकाणी सुरु असून पुढील पाच वर्षात मुंबईत 50 घरांची निर्मिती करण्याचा प्रयत्न असेल. ही घरं प्रत्येक उत्पन्न गटासाठी असतील. आर्थिक दृष्ट्या  दुर्बल, अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी ही घरं असतील.  म्हाडाच्या नियमानुसार ज्या कुटुंबांचं उत्पन्न 6 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना ईडब्ल्यूएस गटातून अर्ज दाखल करता येईल. ज्यांचं उत्पन्न 6 ते 9 लाख उत्पन्न असेल त्यांना अत्यल्प उत्पन्न गटातून अर्ज करता येतील.

म्हाडाकडून प्रत्येक शहरात वर्षातून दोनवेळा लॉटरी काढण्याचं नियोजन आहे. मात्र, मुंबईत म्हाडापुढं प्रमुख आव्हान हे जागेचं आहे. परवडणाऱ्या घरांची दरवर्षी निर्मिती करावी लागणार आहे.ज्या इमारती वाईट स्थितीत आहेत त्यांच्या पुनर्बांधणीसाठी आगामी 5-10 वर्षात प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, म्हाडाकडून यावेळी 2030 घरांसाठी लॉटरी काढलेली आहे. या घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर इतकी आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2024 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).