Mumbai Metro Line 3: मुंबई मेट्रोच्या धारावी-वरळी टप्प्याला अजून सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतिक्षा; पहा कसा असेल हा प्रवास?
मुंबई मेट्रो 3 च्या दुसर्या टप्प्यातील स्थानकांमध्ये धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक यांचा समावेश आहे.
Mumbai Metro 3 Aqua Line Expansion: मुंबईकरांचा प्रवास वेगवान करण्यासाठी आता मेट्रो सेवा देखील सज्ज होत आहे. मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro Line 3) अर्थात अॅक्वा लाईनचा (Mumbai Metro 3 Aqua Line) दुसरा टप्पा आता तयार आहे. त्याच्या लोकार्पणाची मुंबईकरांना प्रतिक्षा आहे. या टप्प्यामध्ये धारावी ते आचार्य अत्रे चौक, वरळी पर्यंतचा भाग जोडला जाणार आहे. सध्या या टप्प्याच्या सुरक्षेची चाचणी प्रलंबित आहे. Commissioner of Metro Rail Safety चे प्रमाणपत्र सेवा सुरू करण्यापूर्वी आवश्यक असल्याने त्याची पूर्तता झाल्यानंतर सेवा लोकांसाठी खुली केली जाणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL)ने बीकेसी आणि आरे दरम्यानच्या मार्गावर adjusted hours of operations पार पाडले. एमएमआरसीनुसार, “आरे-बीकेसी कॉरिडॉर आणि आचार्य अत्रे चौकापर्यंतच्या नवीन मार्गामधील अंतिम चाचणी एकत्रीकरणाचा भाग म्हणून (6 स्थानकांचा समावेश करून), मुंबई मेट्रो लाईन 3 ही 18 एप्रिल रोजी सकाळी 8.30 ते रात्री 10.30 पर्यंत चालेल. नक्की वाचा: Mumbai Metro-3 Aqua Line Expansion: मुंबई मेट्रो 3 चा वरळी पर्यंतचा टप्पा लवकरच होणार सुरू; आरे ते सिद्धिविनायक अवघ्या 34 मिनिटांत, 60 रूपयांत गाठणं होणार शक्य.
मेट्रो लाईन 3 चा पहिला टप्पा - आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) सुरू आहे, जो 10 स्थानकांसह 12.44 किमी अंतरावर चालवला जातो. या मार्गावर सकाळी 6.30 ते रात्री 10.30 पर्यंत दररोज 96 फेऱ्या होतात. ज्याचे भाडे एकेरी प्रवासासाठी 10-50 रुपयांपर्यंत आहे. मेट्रोमुळे आरे आणि बीकेसी दरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी होऊन फक्त 30 मिनिटांवर आला आहे. विशेषतः जास्त रहदारीच्या वेळी, पश्चिम द्रुतगती महामार्गाने रस्त्याने एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो.
मुंबई मेट्रो 3 च्या दुसर्या टप्प्यातील स्थानकं
मुंबई मेट्रो 3 च्या दुसर्या टप्प्यातील स्थानकांमध्ये धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक यांचा समावेश आहे.
वरळीपर्यंतच्या आगामी दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारामुळे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे तसेच प्रवाशांना अधिक परवडणारा आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध होणार आहे.
एकूण 33.5 किमी लांबीची अंडरग्राऊंड मेट्रो लाईन 3 पूर्णपणे सुरू झाल्यानंतर, ती सहा प्रमुख व्यावसायिक जिल्हे, 30 प्रमुख कार्यालये, 12 शैक्षणिक संस्था, 11 हॉस्पिटल्स, 10 वाहतूक नोड्स आणि 25 धार्मिक आणि मनोरंजन केंद्रांना जोडणार आहे. यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांना झटपट जाता येणार आहे. मेट्रो लाईन 3 ही शहरातील सर्वात बिझी वाहतूक लाईनपैकी एक असण्याची अपेक्षा आहे, जी पूर्ण ऑपरेशनच्या पहिल्या वर्षात 1.4 दशलक्ष प्रवाशांना रोज सेवा देऊ शकणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2025 09:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

