Mumbai Metro Andheri-Ghatkopar Additional Trips: अंधेरी-घाटकोपर मार्गावर मुंबई मेट्रोकडून अतिरिक्त फेऱ्या; चाचणी सुरु

अंधेरी-घाटकोपर मेट्रो (Andheri-Ghatkopar Metro) दरम्यान प्रवाशांची संख्या वाढल्याने स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावर अतिरिक्त फेऱ्या सुरु करण्याबाबत चाचण्या सुरु करण्यात येणार आहेत.

Metro (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

मेट्रो सेवा (Mumbai Metro Service) मुंबईकर स्वीकारत असून, उपलब्ध ठिकाणी मुंबई शहरातील नागरीक मेट्रोने (Mumbai Metro) प्रवास करण्यास प्राधान्य देत असल्याचे पाहाला मिळत आहे. प्रामुख्याने अंधेरी-घाटकोपर मेट्रो (Andheri-Ghatkopar Metro) दरम्यान प्रवाशांची संख्या वाढल्याने स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावर अतिरिक्त फेऱ्या सुरु करण्याबाबत चाचण्या सुरु करण्यात येणार  आहेत. आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर येत्या सोमवारपासून मेट्रोच्या नव्या म्हणजेच अतिरिक्त फेऱ्या (Mumbai Metro Andheri-Ghatkopar Additional Trips) कार्यन्वीत केल्या जातील, अशी माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक आनंदाची बाब असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

गर्दीवर तोडगा, प्रवाशांना दिलासा

वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावरुन मुंबई मेट्रोच्या एकूण 11.4 किलोमीटर लांबीच्या मार्गावर एकूण 12 स्थानके आहेत. या स्थानकांवर मेट्रोच्या अनेक फेऱ्या होतात. मात्र, दिवसेंदिवस वाढणारी गर्दी पाहता ती नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त फेऱ्या सुरु करण्याचा प्रयत्न मेट्रो प्रशासन करत आहे. दरम्यान, अतिरिक्त फेऱ्या मर्यादित स्थानकांसाठीच असणार असल्याची माहिती आहे. नेटवर्क 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, अतिरिक्त फेऱ्या केवळ घाटकोपर ते अंधेरी स्थानकादरम्यानच असतील. दरम्यान, अतिरिक्त फेऱ्यांमुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे प्रवाशांची स्थानकांवर होणारी गर्दी तर कमी होणारच आहे. पण, प्रवाशांनाही सुखाचा प्रवास करता येणार आहे. (हेही वाचा, Maha Mumbai Metro WhatsApp Ticketing: महा मुंबई मेट्रोने सुरु केली व्हॉट्सॲप-आधारित तिकीट सेवा; रांगेत उभा न राहता केवळ 'Hi' मेसेजने होणार काम, जाणून घ्या नंबर व संपूर्ण प्रक्रिया)

कसे असेल वेळ आणि फेऱ्यांचे गणित?

विद्यमान स्थितीत घाटकोपर ते वर्सोवा अशा मेट्रो फेऱ्या होतात. ज्या सामान्य मानल्या जातात. दरम्यान, आता नव्याने सुरु होणाऱ्या अतिरीक्त फेऱ्या घाटकोपर ते अंधेरी या स्थानकांदरम्यान राहतील. शिवाय त्या सकाळी: 8:30 ते 10 :40 आणि सायंकाळी: 6: 29 ते 8: 30 या वेळेत उपलब्ध असतील. दरम्यान, असे असले तरी नियमी आणि अतिरिक्त फेऱ्यांसाठी एकच मार्ग उपलब्ध असल्याने. फेऱ्यांचे नियोजनही करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक दोन फेरीनंतर एक मेट्रो घाटकोपर ते वर्सोवा अशी प्रवास करेन. तर दुसरी फेरी फक्त अंधेरीपर्यंतच असणार आहे. (हेही वाचा: Thane-NMIA Elevated Corridor: बांधला जाणार ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणारा 26 किलोमीटरचा उन्नत मार्ग; CIDCO ची योजना)

चाचण्या सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर ते वर्सोवा दरम्यानच्या प्रत्येक फेरीनंतर एक गाडी केवळ अंधेरी ते घाटकोपर अशी चालवली जात आहे. सर्व चाचण्या सकारात्मक झाल्यास येत्या 4 एप्रिलपासून या सेवा नियमीत वेळेत म्हणजेच कार्यालयीन वेळेत सुरु केल्या जातील, असे सांगण्यात येत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement