Mumbai Mega Block Update: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक; जाणून घ्या वेळा

पश्चिम रेल्वे मार्गावर आज कोणताही मेगा ब्लॉक नसणार आहे.

AC local trains (Photo Credit: PTI)

मुंबई मध्ये आज हार्बर (Harbour)  आणि मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर  मेगा ब्लॉक (Mega Block) आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी मार्गावर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आज कोणताही मेगा ब्लॉक नसणार आहे. या ब्लॉकच्या काळाट काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत तर काही उशिराने धावणार आहेत. त्यामुळे आज घराबाहेर पडणार असाल आणि लोकल ट्रेनने प्रवास करणार असाल तर खालील माहिती नक्की वाचा.

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते 4.05 या वेळेत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या काळात स्लो ट्रॅकवरील काही गाड्या फास्ट ट्रॅक वर वळवण्यात आल्या आहे. त्यामुळे या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड स्टेशन वर देखील थांबतील. आज ब्लॉकच्या काळात लोकल फेर्‍या 20 मिनिटं उशिराने धावण्याची शक्यता आहे. नक्की वाचा: Dog Rescue From Rail Track Viral Video:रेल्वे ट्रॅकवर कुत्रा पाहून मुंबई लोकल समोर मुक्या प्राण्याला वाचवायला उतरला तरूण; 'जिगरबाज' वृत्तीचं सोशल मीडीयात कौतुक (Watch Video).

पहा ट्वीट

हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल-वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते 4.05 या काळात ब्लॉक असणार आहे त्यामुळे पनवेल/बेलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द असतील तर ठाणे-वाशी/नेरुळ आणि बेलापूर/ नेरुळ-खारकोपर मार्गावरील लोकलसेवा कायम राहणार आहे.