Mumbai Mega Block Updates : मुंबई मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावर आज मेगाब्लॉक, मुंबईकरांनो घराबाहेर पडताना वेळापत्रक जाणून घ्या
त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला मुंबई मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेप्रवासावरही मर्यादा आहेत. म्हणून घ्या जाणून मेगा ब्लॉक वेळापत्रक.
Mumbai Mega Block on Sunday, June 9, 2024: मुंबई लोकलने प्रवास करण्याचा आज (रविवार, 9 जून) तुमचा विचार असेल तर तुम्हाला मेगा ब्लॉक आणि मुंबईचा पाऊस अशा दोन्ही गोष्टींबाबत एकाच वेळी जाणून (Mumbai Local Updates) घ्यावे लागणार आहे. एका बाजूला मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगर आणि या शहरांना जोडणाऱ्या इतर सर्व शहरांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला मुंबई मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेप्रवासावरही मर्यादा आहेत. म्हणून घ्या जाणून मेगा ब्लॉक वेळापत्रक.
मध्य रेल्वे मेगा ब्लॉक
मुंबई मध्य रेल्वे मार्गावर रविवारी घेण्यात आलेला मेगाब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन थीम्या मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या काळात सीएसएमटी येथून डाऊन दिशेने सुटणाऱ्या धीम्या गतीच्या रेल्वे गाड्या सकाळी 11.04 ते दुपारी 2.46 या कालावधीत सीएसएमटी ते विद्याविहार या स्थानकांदरम्यान जलद मार्गांवर वळविण्यात येतील. या गाड्या पुढे भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावरुन धावतील.
मुंबई मध्य रेल्वे मार्गावर घाटकोपर स्टेशनवरुन अप दिशेने जाणाऱ्या गाड्या सकाळी 11.14 ते दुपारी 2.48 या कालावधीत धावणाऱ्या धम्या गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान जलद मार्गांवर वळविण्यात येतील. ज्या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.
पश्चिम रेल्वे मेगा ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर घेण्यात येणारा मेगा ब्लॉक चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल (लोकल) स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 15.35 वाजेपर्यंत असणार आहे. हा मेगाब्लॉक जवळपास पाच तासांचा असल्यमुळे त्याला जम्बो मेगाब्लॉक म्हटले आहे. ब्लॉक काळात चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल (लोकल) स्थानकांदरम्यान धावणाऱ्या सर्व जलद गाड्या धिम्या मार्गांवरुन चालतील. ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रका दिली आहे.
एक्स पोस्ट
हार्बर मार्ग मेगाब्लॉक
दरम्यान, हार्बर रेल्वेमार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल तर चुनाभट्टी/वांद्रे-सीएसएमटी हार्बर मार्गावर असणारा मेगाब्लॉक सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / वडाळा रोडवरून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत बंद असेल. त्यामुळे तुम्ही जर घरातून बाहेर पडत असाल तर रेल्वे मेगाब्लॉक वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा.