Mumbai Mega Block: मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज विशेष मेगाब्लॉक, पाहा रविवारचे विशेष वेळापत्रक
आजही तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिनही रेल्वेमार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे.
मुंबईत प्रत्येक रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक (Megablock) असणे मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. आजही तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिनही रेल्वेमार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. यात मध्य मार्गावरील मेगाब्लॉक सकाळी 11.15 मिनिटांनी सुरु होणार असून दुपारी 3.45 वाजेपर्यंत असणार आहे.मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावरील लोकल ब्लॉक दरम्यान रद्द करण्यात येतील.
मध्य मार्गावरील मेगाब्लॉक:
1. मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक दरम्यान कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे जाणा-या जलद मार्गावरील लोकल दिवा ते परळ स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. या वेळी लोकल सर्व स्थानकांवर थांबतील.
2. परळ स्थानकानंतर लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील.
3. सीएसएमटी येथून सकाळी 10.05 ते दुपारी 3.22 वाजेपर्यंत कल्याण दिशेकडे जाणा-या लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील.
पश्चिम मार्गावरील मेगाब्लॉक:
1. सीएसएमटीहून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.16 वाजेपर्यत वांद्रे/गोरेगाव दिशेकडे एकही लोकल धावणार नाही.
2. तसेच गोरेगाव/वांद्रेहून सकाळी 10.45ते दुपारी 4.58 वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेकडे जाणा-या लोकल रद्द केल्या जातील.
3. पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.
हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक:
1. हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी/वांद्रे दिशेकडे जाणा-या लोकल सकाळी 11.40 वाजल्यापासून ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत रद्द केल्या जातील.
2. सीएसएमटी/वडाळा रोडहून सकाळी 11.34 ते दुपारी 4.23 वाजेपर्यंत वाशी / बेलापूर / पनवेल या दिशेकडे तसेच सीएसएमटीहून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.16 वाजेपर्यत वांद्रे/गोरेगाव दिशेकडे एकही लोकल धावणार नाही.
3. हार्बर मार्गावरील माहिम स्थानकावर 21 जुलै रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार असून, यादरम्यान धारावी रोड उड्डाणपुलाचे काम केले जाईल.
हेही वाचा- लोकल रेल्वेचे तिकिट दर वाढण्याचे संकेत, मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार 6 वातानुकूलित लोकल रेल्वे
या मेगाब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकावरून पनवेल-कुर्ला विशेष लोकल गाड्या चालविण्यात येतील. ब्लॉक काळात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्याच तिकीट किंवा पासवर पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची मुभा राहील.