मुंबई: मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, आजारी असूनही निवडणूकीचे काम जबरदस्तीने करायला लावल्याचा कुटुंबियांचा आरोप
मुंबई (Mumbai) येथील मंत्रालातील (Mantralaya) महिला कर्मचारी यांना लोकसभा निवडणूकीचे काम ऐन आजारपणात करायची बळजबरी केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.
मुंबई (Mumbai) येथील मंत्रालातील (Mantralaya) महिला कर्मचारी यांना लोकसभा निवडणूकीचे काम ऐन आजारपणात करायची बळजबरी केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या महिला कर्मचारी या मंत्रालयाच्या सांस्कृतिक विभागात कार्यकरत होत्या.
प्रिती धुर्वे असे नाव त्यांचा आज मृत्यू झाल्याने मीडिया रिपोर्ट्नुसार सांगण्यात येत आहे. प्रिती यांना 18 एप्रिलला कावीळ झाली असल्याने त्यांनी रजेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाक केला. मात्र शिवडी येथील मतदारसंघातील जिल्हा निवडणूक आयोग अधिकाऱ्यांकडून हा अर्ज मान्य करण्यात आला नाही. यामुळे ऐन कावीळ असतानासुद्धा त्यांना दहा दिवस काम करावे लागले होते.(धक्कादायक! राज्यात जनावरे घोटाळा उघडकीस; चारा छावण्यांमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून भ्रष्टाचार)
त्यानंतर 29 एप्रिलला प्रिती यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून न आल्याने त्यांना पुन्हा नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान प्रिती यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.