मुंबई मध्ये 17 वर्ष एक व्यक्ती करतोय दोन सरकारी नोकर्‍या; आझाद मैदान पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

ऑगस्ट 1999 ते मे 2000 दरम्यान, कांबळे यांना 289 दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याचे एफआयआर मध्ये नोंदवण्यात आले आहे.

Job ( Photo Credit - File Image)

मुंबई मध्ये कामा हॉस्पिटल (CAMA Hospital)  मध्ये वॉर्ड बॉय आणि बेस्ट (BEST) मध्ये सफाई कर्मचारी अशा 2 सरकारी नोकरीमध्ये असल्याच्या आरोपाखाली आझाद मैदान पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अशाप्रकारे तो 17 वर्ष दोन सरकारी नोकर्‍या करत होता. दरम्यान 2013 सालीच दिनेश कांबळेचं पितळ उघडं पडलं होतं मात्र या प्रकरणी पोलिस तक्रार सोमवार 4 जुलै दिवशी नोंदवण्यात आली आहे.

कांबळे पुढल्या वर्षी सेवा निवृत्त होणार आहे. दरम्यान दोन सरकारी नोकर्‍या करता येत नाहीत हा नियम ठाऊक नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे तसेच दोन नोकर्‍या या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्यासाठी केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. MPSC Recruitment 2022: MPSC मार्फत विविध विभागांमधील 800 नव्या पदांची भरती .

59 वर्षीय कांबळे यांनी1991 साली कामा हॉस्पिटल मध्ये नोकरी स्विकारली. त्यानंतर 4 वर्षांनी त्यांना बेस्टच्या कुलाबा डेपो मध्येही सफाई कर्मचार्‍याची नोकरी मिळाली. कामा हॉस्पिटल मधीन कांबळेंना मधली 7 वर्ष जे जे हॉस्पिटल मध्येही बदली देण्यात आली होती.

मार्च 2013 मध्ये एका निनावी पत्राने बेस्टच्या महाव्यवस्थापकांना कळवल्यानंतर कांबळे यांच्याबदद्ल सारा प्रकार समोर आला. उच्च अधिकार्‍यांनी कामा यांना इशारा दिला आणि दोघांनीही तक्रारीच्या चौकशीसाठी स्वतंत्र समित्या स्थापन केल्या. बेस्टने कांबळे यांना बडतर्फ केले, तर कामा यांनी त्यांना निलंबित केले.

ऑगस्ट 1999 ते मे 2000 दरम्यान, कांबळे यांना 289 दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याचे एफआयआर मध्ये नोंदवण्यात आले आहे.

तपासात माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना संशय आहे की कांबळेने सिक लिव्ह आणि मेडिकल लिव्ह यांचा वापर दोन्ही नोकऱ्या सांभाळण्यासाठी केला. "एका ठिकाणी रजा घेत असताना तो दुसऱ्या ठिकाणी काम करत होता. तसेच विविध कारणे सांगून हॉस्पिटलमधील नोकरीत ५ वर्षे ५ महिने गैरहजर असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. हा कालावधी त्याने इतर नोकरी सांभाळण्यासाठी वापरला असावा. तसेच, त्याने दोन्ही ठिकाणी त्याच्या शिफ्ट ड्युटीचा फायदा घेतला असावा. मात्र, अधिकाऱ्यांची मदत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही."

कांबळे यांना कामा यांनी निलंबित केले होते पण त्यांना दररोज रूग्णालयात हजेरी लावण्यासाठी येणे आवश्यक होते. त्यांना अर्धा दिवसाचा पगार देण्यात आला होता, असे कामा रुग्णालयाच्या कार्यालयीन सचिव कांचन उंब्रजकर यांनी सांगितले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif