Mumbai: लग्नाला नकार दिल्याने तरुणीला धावत्या लोकलखाली ढकललं; खार स्थानकातील घटनेने खळबळ

लग्नाला नकार दिल्याने तरुणीला धावत्या लोकलखाली ढकलून देण्याचा प्रकार मुंबईतील खार रेल्वे स्थानकात घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

Mumbai: लग्नाला नकार दिल्याने तरुणीला धावत्या लोकलखाली ढकललं; खार स्थानकातील घटनेने खळबळ
Mumbai Local | Photo Credits: Unsplash.com

लग्नाला नकार दिल्याने तरुणीला धावत्या लोकलखाली ढकलून देण्याचा प्रकार मुंबईतील (Mumbai) खार रेल्वे स्थानकात (Khar Railway Station) घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सुमेध जाधव (21) असं या आरोपी तरुणाचं नाव असून तो वडाळा येथील रहिवासी आहे. तर तरुणी खार येथे राहते. हे दोघेही एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखत असून त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते. मात्र आरोपी तरुणाला दारुचे व्यसन लागल्याने तरुणी त्याचापासून दूर राहू लागली. त्यानंतर तो तरुणीला त्रास देऊ लागला. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करुनही त्याचं त्रास देणं सुरुच होतं. (एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; यवतमाळ येथील घटना)

शुक्रवारी सायंकाळी सुमेधे तिचा पाठलाग करत होता. तो अंधेरी रेल्वे स्थानकावरून लोकलमधअये चढला. त्यानंतर तरुणीने आईला मदतीसाठी आईला फोन केला. तिची आई रेल्वे स्टेशनवर तिला भेटली. दरम्यान, आरोपीने तिला लग्नासाठी विचारले. मात्र तरुणीने नकार देताच त्याने स्वत:ला संपवण्याची धमकी दिली. तो लोकलच्या दिशेने धावत सुटला आणि मध्येच अचानक थांबला. परत येऊन त्याने तरुणीला जबरदस्तीने लोकलच्या दिशेने नेलं आणि प्लॅटफॉर्म आणि धावत्या लोकलच्या मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. तरुणीच्या आईने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तरुणीच्या डोक्याला जबर मार बसला असून तिला 12 टाके पडले आहेत.

(हे ही वाचा: Nagpur Shocker: एकतर्फी प्रेमातून घरात घुसून तरुणीच्या आजीसह लहान भावाची हत्या; परिसरात खळबळ)

दरम्यान, आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे. तर जखमी तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Feb 21, 2021 10:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).